रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ३१ ऑक्टोबर या दिवशी विन्हेरे ते चिपळूण या स्थानकांदरम्यान आणि मडुरे (सिंधुदुर्ग) ते मडगाव जंक्शन या स्थानकांदरम्यान ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’ (मेगाब्लॉक म्हणजे अधिक कालावधीसाठी वाहतूक थांबवणे) करण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे ३१ ऑक्टोबरला ६ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार,
विन्हेरे ते चिपळूण दरम्यान ३१ ऑक्टोबर या दिवशी दुपारी १२.१० ते १५.१० या वेळेत मेगाब्लॉक असून यामुळे ‘०२१९७ कोइम्बतूर-जबलपूर विशेष गाडी ३० ऑक्टोबर या दिवशी मडगाव जंक्शन ते चिपळूण दरम्यान ९० मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे. १०१०६ ही सावंतवाडी-दिवा गाडी ३१ ऑक्टोबर या दिवशी सावंतवाडी रोड ते चिपळूण दरम्यान ९० मिनिटे थांबवून ठेवण्यात येणार आहे.
मडुरे (सिंधुदुर्ग) ते मडगाव जंक्शन या स्थानकांदरम्यान ३१ ऑक्टोबर या दिवशी दुपारी १३.२० ते १६.२० या वेळेत मेगाब्लॉक असून यामुळे १२०५१ मुंबई-मडगाव ‘जनशताब्दी’ एक्सप्रेस रत्नागिरी ते सावंतवाडी रोड या दरम्यान ८० मिनिटे थांबवली जाणार आहे. २२११० मुंबई-मडगाव ‘तेजस’ एक्सप्रेस रत्नागिरी ते सावंतवाडी रोड या दरम्यान ६० मिनिटे थांबवली जाणार आहे. १२६१८ निजामुद्दीन-अर्नाकुलम् ही गाडी ३० ऑक्टोबर या दिवशी २० मिनिटे कणकवली स्थानकात थांबवली जाणार आहे, तर २२१४९ एर्नाकुलम् पुणे ही गाडी ५५ मिनिटे कारवार ते मडगाव जंक्शन या स्थानकांदरम्यान थांबवली जाणार आहे.