|
बेंगळुरू (कर्नाटक) – वाघनखांचे लॉकेट घातले; म्हणून अनेकांच्या घरावर सरकारकडून धाड टाकण्यात येत आहे. याद्वारे हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे, असा आरोप भाजपचे आमदार अरविंद बेल्लाद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला. ‘राज्यात दुष्काळ आणि विद्युत् यांच्या असलेल्या समस्येवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सरकारने वाघनखांचे प्रकरण उकरून काढले आहे’, असा आरोपी त्यांनी केला. या संदर्भात राज्य सरकारला पत्र पाठवले असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
आमदार बेल्लाद पुढे म्हणाले की,
१. कुणी जिवंत वाघाची नखे काढून ती वापरत नाही. तेवढे शूर कुणीच नाही. मेलेल्या वाघांची नखे आणून वापरली असतील. अनेक लोक लॉकेटसाठी वाघनखांसारखी दिसणारी प्लास्टिकची नखे वापरतात.
२. सर्वांच्या विरोधात समान कारवाई केली पाहिजे. मुसलमानांच्या दर्ग्यात मोरपिसांचा वापर केला जातो, मग दर्ग्याच्या विरोधातही कारवाई केली पाहिजे. केवळ हिंदूंना लक्ष्य करून गुन्हे नोंदवू नका.
३. मौलवींच्या (इस्लामच्या धार्मिक नेत्यांच्या) विरोधात गुन्हा नोंदवा. सर्व मौलवींना ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा द्या. त्यानंतर तुम्हाला जंगलाच्या रक्षणाची काळजी किती आहे ?, ते जनतेला समजेल.
संपादकीय भूमिकाकर्नाटकातील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष ! काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ? |