
रत्नागिरी – आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात ३ दिवस योग प्रात्यक्षिके आणि सराव यांचा समावेश होता. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक तसेच कला, वाणिज्य, विज्ञान आणि एम्.सी.व्ही.सी. शाखेतील ४०० विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विविध शाखांच्या विद्यार्थ्यांनी ‘कॉमन योगा प्रोटोकॉल’प्रमाणे योगासने, प्राणायाम आणि ध्यानसत्रात सहभाग नोंदवला. विविध स्थितीतील योगासनाचे प्रकार मुलांनी केले. प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक करून त्याचे महत्व समजून घेतले.
महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्र. उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय वालावलकर यांनी शुभेच्छा दिल्या आणि योग ही नित्य करायची कृती असल्याचे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले. या वेळी विज्ञान शाखेचे प्रमुख प्रा. दिलीपकुमार शिंगाडे उपस्थित होते. समारोप कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झाला. कला शाखाप्रमुख प्रा. वैभव कानिटकर यांनी ‘योग तुम्हाला निरोगी आणि सुदृढ आयुष्य देईल अन् जीवनाला आत्मविश्वास प्राप्त करून देईल’, असे सांगितले. प्रा. निनाद तेंडुलकर यांनी विद्यार्थ्यांना योग आणि प्राणायाम याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा विभागप्रमुख प्रा. लीना घाडीगांवकर आणि प्रा. राकेश मालप यांनी केले. त्यांना राष्ट्र्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अभिजीत भिडे, प्रा. मनस्वी लांजेकर प्रा. सारीका माळी, सेवक महेश खैरे आणि विनोद कुर्टे यांनी सहकार्य केले.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !