एक सैनिक आणि ४ नागरिक घायाळ
जम्मू (जम्मू-काश्मीर) – पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करून भारतीय सीमेवर गोळीबार आणि मोर्टार (मोठे तोफगोळे) डागण्यास चालू केले आहे. जम्मूच्या अरनिया आणि आर्.एस्. पुरा सेक्टर येथे २६ ऑक्टोबरच्या रात्री ८ वाजता पाकिस्तानी सैन्याने गोळीबार करत मोर्टार डागले. यात सीमा सुरक्षा दलाचा १ सैनिक आणि ४ नागरिक घायाळ झाले. पाक सैन्याच्या या कुरापतीवर भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. यात पाकची मोठी हानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या १० दिवसांत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची ही दुसरी घटना आहे. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्याने सांगितले की, पाक सैन्याने भारतीय सैन्याच्या ५ चौक्यांवर गोळीबार केला.
#WATCH | Jammu and Kashmir: Visuals from RS Pura sector where an explosion is heard after Pak Rangers started unprovoked firing on BSF posts in Arnia area in violation of the ceasefire. https://t.co/wgZISa5VJ9 pic.twitter.com/DUz9QJKU6i
— ANI (@ANI) October 26, 2023
संपादकीय भूमिकाभारत कुरापतखोर पाकला जन्माची अद्दल कधी घडवणार ? |