प्रथम वंदितो श्री गजानना ।
विजयादशमीच्या शुभदिनी ।।
कलियुगातील दशाननाचा ।
वध करूया सर्वांनी ।। १ ।।
कलियुगातील दशाननाची ।
प्रथम जाणूया दशानने ।।
तद्नंतर कृती करूया ।
श्रीरामनाम आणि श्रीरामकृपेने ।। २ ।।
दशानने ही महाभयंकर ।
कशी नावे आहेत पहा ।।
अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण ।
भ्रष्टाचार, धर्मांतरण ।। ३ ।।
परिवारवाद, अलगाववाद ।
अन् त्यासवे आतंकवाद ।।
लव्ह जिहाद, लँड (भूमी) जिहाद ।
हलाल जिहाद, थूंक जिहाद ।। ४ ।।
असा हा दशानन असुर रावण ।
नष्ट करूया सर्व आपण ।।
सदैव यास्तव करू श्रीराम स्मरण ।
करूया श्रीरामकृपा संपादन ।। ५ ।।
अशा दशानन रावणाचे ।
करूया समूळ उच्चाटन ।।
ज्याने रामराज्याची होईल ।
निर्मिती विराट विशाल विस्तीर्ण ।। ६ ।।
सच्चिदानंद परब्रह्म रूप डॉ. आठवले ।
यांची आहे हीच गुर्वेच्छा ।।
विजयादशमीच्या सर्वांना ।
असंख्य अमृत हार्दिक शुभेच्छा ।। ७ ।।
– श्री. दत्तात्रय पटवर्धन (वय ७० वर्षे), कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (१४.१०.२०२३)