अलीगड (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर मशिदीजवळ तलवार आदी शस्त्रांद्वारे आक्रमण : २५ जण घायाळ

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथे ‘राम बारात’ काढणार्‍या हिंदूंची मिरवणूक मशिदीजवळ आली असता अनुमाने १५० धर्मांध मुसलमानांनी त्यावर केलेल्या आक्रमणात २५ जण घायाळ झाले. ‘राम बारात’ ही उत्तर भारतात साजरा करण्यात येणार्‍या ‘रामलीला’ महोत्सवाचा भाग आहे. यात सीतेचा विवाह श्रीरामाशी लावल्यानंतर वरात काढली जाते. त्याला ‘राम बारात’ असे म्हणतात. या मिरवणुकीवर आक्रमण करतांना धर्मांध मुसलमानांनी तलवार, लोखंडी सळ्या, गावठी पिस्तुले, कुर्‍हाड आदी शस्त्रांचा वापर केला. ते मिरवणूक रोखू इच्छित होते. हे आक्रमण नियोजनबद्धरित्या करण्यात आले. या घटनेच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. त्यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

राम बारात मिरवणूक मशिदीजवळून जात असतांना प्रथम त्यावर दगडफेक करण्यात आली. यामुळे मिरवणुकीत सहभागी हिंदूंमध्ये गोंधळ निर्माण झाला. यानंतर धर्मांधांनी त्यांच्यावर आक्रमण केले.

संपादकीय भूमिका

  • उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
  • मशिदीजवळील धर्मांध मुसलमानांकडे शस्त्रे कुठून येतात, याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे !