काश्मीरमधील पूंछ येथील हिंदू आणि शीख यांना जिहादी मुसलमानांची धमकी !
पूंछ (जम्मू-काश्मीर) – पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पूंछ जिल्ह्यातील देगवार सेक्टर येथे १४ ऑक्टोबरच्या सायंकाळी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्या घरांवर भित्तीपत्रके चिकटवली. यावर उर्दूमध्ये ‘सर्व हिंदू आणि सरदार (शीख) समाजाला लवकरात लवकर हा परिसर सोडण्याची चेतावणी देण्यात आली आहे, अन्यथा तुम्हाला याची मोठी किंमत चुकवावी लागेल’, अशी धमकी देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पूंछ पोलीस ठाण्याचे अधिकारी दीपक पठानिया सुरक्षादलाच्या पथकासह घटनास्थळी पोचले. त्यांनी सरपंचांच्या उपस्थितीत भित्तीपत्रके जप्त केली. अधिवक्ता महिंदर पियासा यांचे घर असलेल्या ‘गीता भवन’च्या मुख्य प्रवेशद्वारावर, तर अन्य दोन भित्तीपत्रके सुजान सिंह यांच्या घराबाहेरून जप्त करण्यात आली. याविषयी हिंदूंनी पोलीस आणि भारतीय सैन्य यांच्याकडे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वर्ष १९९० मध्येही अशाच प्रकारे हिंदूंच्या घरांवर भित्तीपत्रके चिकटवून, तसेच मशिदींवरील भोंग्यांवरून हिंदूंना त्यांच्या महिला आणि संपत्ती सोडून जाण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर जिहाद्यांनी हिंदूंवर आक्रमण करून त्यांना ठार मारले होते. यामुळे लाखो हिंदूंनी काश्मीरमधून पलायन केले होते. ते आजही काश्मीरमध्ये परतू शकलेले नाहीत.
संपादकीय भूमिका
|