पाटण (जिल्हा सातारा) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई !

प्रतीकात्मक छायाचित्र

सातारा, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कराड-चिपळूण मार्गावरील गोषटवाडी येथे कारवाई केली. या कारवाईमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह सहाचाकी आणि चारचाकी वाहने असा १९ लाख ७५ सहस्र ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली.

या कारवाईमध्ये २५ खोकी गोवा बनावटीचे मद्य, एक दुधाचे सहाचाकी वाहन, सकस दुधाची ५५३ कॅरेट आणि एक चारचाकी वाहन कह्यात घेण्यात आले आहे. तसेच ३ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये विविध कलमांखाली गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.