निराश महिलांना संपर्क करण्याचे आवाहन !
मुंबई, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – मुंबईतील लोकल ट्रेन आणि बस थांबे यांवर उघडपणे ‘वशीकरण स्पेशालिस्ट’ (वशीकरण तज्ञ) म्हणून मुसलमान बाबाची विज्ञापनाची मोठ्या प्रमाणात लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या विज्ञापनामध्ये ‘निराश माता-भगिनी यांनी एकदा अवश्य संपर्क करावा’, असे आवाहनही करण्यात आले आहे. वशीकरणाची उघडपणे विज्ञापने करूनही या प्रकरणी पोलीस किंवा रेल्वे प्रशासन यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आल्याचे आढळलेले नाही.
‘प्रेमात फसवणूक, ग्रहदोष, तसेच आपणाला कोणतीही समस्या असल्यास त्वरित संपर्क करा’, असे आवाहन करून संपर्कासाठी या विज्ञापनात रजा खान नामक व्यक्तीचा ‘८४४६८८५१६४’ हा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. ‘मनाप्रमाणे प्रेम, लग्न, व्यवहार, आई-वडील यांना सिद्ध (राजी) करणे, सवत-शत्रू यांच्यापासून सुटका, नोकरी, घरातील भांडणे, मूल न होणे, कर्ज, आजारपण, करणी यांवर खात्रीलायक उपचार केले जातील’, असे या विज्ञापनात म्हटले आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेनमध्ये, तसेच मुंबईतील अनेक बसथांबांवर ही पत्रके मोठ्या प्रमाणात लावण्यात आली आहेत. (हिंदूंच्या धार्मिक विधींना ‘अंधश्रद्धा’ म्हणून हिणवणारे अंनिसवाले या प्रकरणी काही करणार का ? – संपादक)
संपादकीय भूमिकायामध्ये ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र नाही ना ? याचाही पोलिसांनी शोध घ्यावा ! |

तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !
हिंदु जनजागृती समितीकडून मंत्री नितेश राणे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !
आषाढी वारीमध्ये वारकर्यांना असुविधा न होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे ! – मंत्री जयकुमार गोरे
१ जुलैला मुंबईत १८९ जणांचा राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांनी गौरव होणार !
महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग