‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात संत आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती येतात. संत आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना भेटल्यावर त्यांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
सद़्गुरु सुशीला आपटेआजी यांची श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यावर असलेली प्रीती !
१. सद़्गुरु आपटेआजींनी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना जवळ घेऊन प्रेमाने त्यांच्या अंगावरून हात फिरवून त्यांचा हात स्वतःच्या कपाळाला लावणे
‘२.९.२०२३ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि आम्ही काही साधक सद़्गुरु आपटेआजींच्या घरी गेलो होतो. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ घरी आल्याचे पाहून सद़्गुरु आपटेआजींना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना जवळ घेऊन प्रेमाने त्यांच्या पाठीवरून, डोक्यावरून आणि चेहर्यावरून हात फिरवला. त्यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा हात धरून तो स्वतःच्या कपाळाला लावला. या सर्व कृतीतून त्यांना श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याविषयी वाटत असलेले प्रेम आणि भाव प्रकर्षाने लक्षात आला. ‘त्यांचा गुरुदेवांविषयी जसा भाव आहे, तसाच काहीसा भाव श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याविषयीही आहे’, असे आम्हाला जाणवले.
२. सद़्गुरु आपटेआजी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना ‘चिदानंदरूपिणी’ असे संबोधत होत्या.’
– कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सौ. वर्धिनी गोरल (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), श्री. अतुल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.९.२०२३)
‘म्हापसा, गोवा येथील सद़्गुरु सुशीला आपटेआजी अधूनमधून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येत असतात. त्या ८६ वर्षे वयाच्या आहेत. त्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना भेटल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना भेटतात. आश्रमात आल्यावर त्या आवर्जून विचारतात, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदासिंगबाळ कुठे आहेत ? त्या आश्रमात आहेत ना ?’’ श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ सद़्गुरु आपटेआजींच्या चरणांना स्पर्श करून त्यांच्याशी पुष्कळ आदराने बोलतात. सद़्गुरु आजी आसंदीवर बसल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ भूमीवर गुडघे टेकलेल्या स्थितीत बसून सद़्गुरु आजींचे दोन्ही हात हातात घेऊन त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधतात. तेव्हा ‘दोघींची जणू अनेक जन्मांपासून जवळीक आहे’, असे मला वाटते.
सद़्गुरु आपटेआजी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याविषयी आम्हाला विचारत असतांना सद़्गुरु आजींच्या डोळ्यांत श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याप्रति विलक्षण भाव जाणवतो. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ सद़्गुरु आजींपेक्षा वयाने लहान असल्या, तरीही सद़्गुरु आजींनी कधीच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘बिंदा’ असे एकेरी नावाने संबोधले नाही. – कु. मेघा चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. |
सौ. प्रणिता आपटे यांचा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी असलेला भाव !
‘सौ. प्रणिता आपटे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांचाही श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याप्रति पुष्कळ भाव आहे. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ घरी येणार आहेत’, हे समजल्यावर सौ. प्रणिताकाकूंनी घराच्या दारात पणत्या लावल्या होत्या. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ घरी आल्यावर त्यांच्या चरणांवर पाणी घालून त्यांचे चरण पुसून स्वागत केले. जणू काही ‘आपल्या घरी देवीच येत आहे’, असा त्यांचा भाव होता.’
– कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सौ. वर्धिनी गोरल (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), श्री. अतुल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.९.२०२३)
समाजातील अन्य काही मान्यवर व्यक्तींनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या सत्संगात अनुभवलेली भावस्थिती !
१. संभाजीनगर येथील नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांच्या पत्नी सौ. वनिता शिवनगिरीकर (देवीभक्त) यांची श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याशी झालेली भावस्पर्शी भेट !
१ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटल्यावर सौ. शिवनगिरीकर यांना भावाश्रू अनावर होणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि संभाजीनगर येथील एक नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांच्या पत्नी सौ. वनिता शिवनगिरीकर (देवीभक्त) यांच्या प्रथम भेटीत त्यांचे एकमेकींशी बोलणे झाल्यावर सौ. शिवनगिरीकर यांना भावाश्रू अनावर झाले.
१ आ. सौ. शिवनगिरीकर यांना श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना भेटल्यावर जणू देवी भेटल्याचा आनंद होणे : त्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या कुशीत जाऊन हुंदके देत होत्या. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ त्यांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत होत्या. तेव्हा सौ. शिवनगिरीकर यांनी सांगितले, ‘‘आश्रमात आल्यावर ‘मला माहेरी आले आहे’, असे जाणवते आणि येथून जावेसे वाटत नाही.’’ सौ. शिवनगिरीकर यांना देवीचा दृष्टांत झाला आहे आणि त्यांना देवीचा आशीर्वाद मिळाला आहे. सौ. शिवनगिरीकर यांना श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना भेटल्यावर जणू देवी भेटल्याचा आनंद होत होता. ते पाहून साधकांचीही भावजागृती होत होती.
१ इ. सौ. शिवनगिरीकर आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजलीमुकुल गाडगीळ यांची झालेली भेट : काही वर्षांपूर्वी पू. यशवंतशिवनगिरीकर महाराज आणि सौ. वनिता शिवनगिरीकर अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची भेट झाली होती. त्या वेळी ‘त्यांची अनेक वर्षांपासून जवळीक आहे’, असे जाणवत होते.
– कु. मेघा चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२. सौ. राजश्री फणसळकर (कै. प.पू. आबा उपाध्ये यांच्या कन्या) यांना आईप्रमाणे आधार देणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !
‘पुणे येथील कै. प.पू. आबा उपाध्ये यांच्या थोरल्या कन्या सौ. राजश्री फणसळकर काही वर्षांपूर्वी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. त्यांना आश्रमात आल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा आईप्रमाणे आधार वाटतो. सौ. राजश्री यांच्या आई-वडिलांच्या (प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये आणि प.पू. आबा उपाध्ये यांच्या) देहत्यागानंतर सौ. राजश्री यांना रामनाथी आश्रम, म्हणजे माहेरच वाटते.’
– कु. मयुरी डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा सत्संग लाभल्यावर आय.ए.एस्. अधिकार्यांनी अनुभवलेली भावस्थिती !
अलीकडेच उत्तर भारतातील एक आय.ए.एस्. (भारतीय प्रशासकीय सेवेतील) अधिकारी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आले होते. ते श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना भेटले. त्या आय.ए.एस्. अधिकार्यांना श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा सत्संग लाभल्यावर ते वेगळ्याच भावस्थितीत होते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ त्यांना चारचाकी गाडीपर्यंत पोचवायला आल्या होत्या. तेव्हा त्या अधिकार्यांच्या डोळ्यांत कृतकृत्य झाल्याचे भाव जाणवत होते. ते श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याकडे न पहाता खाली पहात होते. ते निःशब्द झाल्याप्रमाणे जाणवत होते.’
– कु. मेघा चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(सर्व लेखांतील सूत्रांचा दिनांक : ४.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |