‘१७.५.२०२६ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. या राजमातंगी यज्ञाला उपस्थित असणार्या सनातनच्या विज्ञापनदात्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. ‘मेटल पॉवर कंपनी’चे संचालक (‘डायरेक्टर’) श्री. प्रियदर्शन पंत
१ अ. श्री. पंत यांना यज्ञाच्या आदल्या दिवशी अस्वस्थ वाटणे आणि साधिकेने सांगितल्याप्रमाणे नामजप, प्रार्थना इत्यादी केल्यावर बरे वाटून ते यज्ञाला येऊ शकणे : ‘१७.५.२०२६ या दिवशी मुंबईत होणार्या राजमातंगी यज्ञाचे निमंत्रण देण्यासाठी मी काही विज्ञापनदाते आणि हितचिंतक यांच्याकडे गेले होते. सर्वप्रथम मी ‘मेटल पॉवर कंपनी’चे संचालक (‘डायरेक्टर’) श्री. प्रियदर्शन पंत यांच्याकडे गेले. गेली २६ वर्षे ते सनातनचे विज्ञापनदाते आणि अर्पणदाते आहेत. त्यांची गुरुदेवांवर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर) पुष्कळ श्रद्धा आहे. सनातन संस्था हिंदुत्वासाठी करत असलेल्या कार्याबद्दल त्यांना कौतुक आणि अभिमान वाटतो.
त्यांनी ‘मी यज्ञाला अवश्य येईन’, असे मला सांगितले. आदल्या दिवशी त्यांना ‘व्हीआयपी पास’ विषयी (अतीमहनीय व्यक्तींसाठी राखीव जागेविषयी) सांगण्यासाठी संपर्क केला असता ते म्हणाले, ‘‘मला अस्वस्थ वाटत आहे. ‘मी येऊ शकेन’, असे मला वाटत नाही.’’ त्या वेळी मी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही दत्ताचा नामजप करा, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’ किंवा सनातनचा एखादा ग्रंथ तुम्ही उशीच्या खाली ठेवून झोपा आणि प्रार्थना करा. उद्या सकाळी तुम्हाला बरे वाटेल.’’ त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर त्यांना दुसर्या दिवशी पुष्कळ बरे वाटले आणि ते यज्ञाला आले. त्या वेळी त्यांना कुठलाही त्रास झाला नाही.
१ आ. श्री. पंत यांनी यज्ञात सहभागी होता आल्याबद्दल आनंद व्यक्त करणे आणि ‘गुरूंच्या संकल्पातील चैतन्यच कार्य करते’, हे साधिकेच्या लक्षात येणे : ते मला म्हणाले, ‘‘जर मी आज आलो नसतो, तर मी इतक्या चांगल्या कार्यक्रमाला, तसेच या चैतन्याला मुकलो असतो. यज्ञाची एवढी चांगली व्यवस्था, तसेच त्याचे चैतन्य आणि आनंद मी आयुष्यात प्रथमच अनुभवत आहे. मला पुष्कळ चांगले वाटले.’’ त्यांचे वय अंदाजे ८५ वर्षे आहे. ते पूर्णाहुती झाल्यावर प्रसाद घेऊनच निघाले. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘गुरूंचा संकल्प, नामजप, सनातनचे ग्रंथ, दैनिक ‘सनातन प्रभात’ यांमध्ये पुष्कळ चैतन्य आहे. ते चैतन्यच एवढे मोठे कार्य करते.’
यज्ञाचे आयोजन पाहून सनातनला विरोध असणार्या एका अर्पणदात्यांच्या पत्नीचे मतपरिवर्तन होणे
‘एका आस्थापनाचे संचालक (‘डायरेक्टर’) सनातनशी गेली २६ वर्षे जोडले गेले आहेत. ते नियमित अर्पण देतात. ते सनातनचे ग्रंथ घेऊन इतरांना देतात. पूर्वी ते त्यांच्या आस्थापनाचे विज्ञापन देत असत; परंतु भागीदारांच्या विरोधामुळे त्यांनी विज्ञापन देणे बंद केले; मात्र त्यांचे वैयक्तिक अर्पण नियमित चालू असते. गुरुदेवांवर त्यांची नितांत श्रद्धा आहे. ‘सर्वकाही गुरुदेवच करत आहेत’, असा त्यांचा भाव असतो. त्यांच्या बोलण्यामध्ये नेहमी गुरुदेवांचा उल्लेख असतो.
ते यज्ञस्थळापासून जवळच रहात असल्यामुळे तेथे चालत येणार होते. तेव्हा त्यांच्या पत्नी त्यांना सोडायला त्यांच्या समवेत आल्या. त्यांचा सनातनला विरोध आहे; परंतु त्या त्यांना सोडायला आत आल्या आणि कार्यक्रम संपेपर्यंत बसल्या. त्यांचे मतपरिवर्तन झाले. त्यांच्या मनातील सर्व विकल्प गेले. याचे त्यांच्या यजमानांना आश्चर्य वाटले. यजमानांनाही पुष्कळ शांत वाटले.’
– श्रीमती स्मिता नवलकर (२८.५.२०२६)
२. ‘हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल कंपनी’चे श्री. आशिष हरिभाऊ विश्वनाथ

२ अ. श्री. आशिष ९० वर्षांच्या आईला घेऊन यज्ञाला येणे आणि आईसह श्री. आशिष यांनाही कार्यक्रमातून आनंद मिळणे : ‘हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल कंपनी’चे श्री. आशिष हरिभाऊ विश्वनाथ हे गेली २७ वर्षे सनातनचे विज्ञापनदाते आणि अर्पणदाते आहेत. ते त्यांच्या आईला घेऊन यज्ञाला आले होते. त्यांच्या आईचे वय ९० वर्षे असूनही त्या यज्ञासाठी पूर्णवेळ थांबल्या होत्या. त्यांना पुष्कळ आनंद होत होता. श्री. आशिष यांनाही कार्यक्रमाची सर्व व्यवस्था आणि कार्यक्रम पुष्कळ आवडला. ते म्हणाले, ‘‘मी पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाला आलो. यातून मला पुष्कळ आनंद आणि शांती मिळाली.’’
३. ‘केंब्रिज टेक्सटाइल’चे मालक श्री. मनोहर भाटिया
३ अ. श्री. मनोहर भाटिया यांनी गुरुकृपेने यज्ञाच्या ठिकाणी शक्ती आणि चैतन्य अनुभवणे : ‘केंब्रिज टेक्सटाइल’चे मालक श्री. मनोहर भाटिया त्यांच्या पत्नीसह यज्ञाला आले होते. तेसुद्धा गेली २६ वर्षे विज्ञापन आणि अर्पण देतात. त्यांची गुरुदेवांवर पुष्कळ श्रद्धा आहे. त्यांनाही कार्यक्रम पुष्कळ आवडला. ते म्हणाले, ‘‘यज्ञाचे ४ घंटे कधी संपले ?’, हे मला कळलेच नाही. एकंदरीत तिकडे पुष्कळ शक्ती आणि चैतन्य जाणवत होते. असा कार्यक्रम मी कधी पाहिला नव्हता. गुरुदेवांच्या कृपेने मला हे अनुभवायला मिळाले.’’
‘गुरुदेवांनी असे विज्ञापनदाते आणि अर्पणदाते जोडून ठेवले आहेत; म्हणून आम्हाला सेवा करणे सहज शक्य होते’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.५.२०२६)
अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !
साधकाच्या शस्त्रक्रियेच्या वेळी ‘शस्त्रक्रिया कधी आरंभ झाली आणि कधी संपली’, हे स्वतःसाठी येता-जाता नामजप करत असतांना आपोआप कळणे अन् तेव्हा जागृत ध्यानावस्था अनुभवणे
वर्णांनुसार साधनेचे महत्त्व आणि चारही वर्णांची साधना करवून मोक्ष देणारी गुरुकृपायोगानुसार साधना
प्रत्येक सेवा आणि कृती मनापासून अन् भावपूर्ण करणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने (वय ७७ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात मंत्रपठण करतांना साधिकेला आलेली अनुभूती