पाकिस्‍तान आणि चीन यांसह भारतातील अंतर्गत शत्रूंचाही विचार करावा लागेल ! – कर्नल आर्.एस्.एन्. सिंह (निवृत्त), संरक्षणतज्ञ

आर्.एस्.एन्. सिंह (निवृत्त)

 

अंतर्गत शत्रूंमुळे हानी झाली आहे. विविध युद्धसामुग्री असतांनाही अंतर्गत शत्रू आणि सांस्‍कृतिक भिन्‍नता यांमुळे ‘सोव्‍हिएत युनियन’चे अनेक देश होतांना आपण पाहिले. भारताचे विविध शत्रू देशावर आघात करत आहेत. भारताच्‍या विरोधात ‘प्रॉक्‍सी वॉर’ (छुपे युद्ध) चालू आहे, ज्‍यात काही देशविरोधी राजकीय पक्ष, शिक्षणसंस्‍था, अधिवक्‍ता, पत्रकार यांचा समूह कार्यरत आहे. कोणताही देश बाहेरील शत्रूंमुळे नव्‍हे, तर अंतर्गत शत्रूंमुळे कोसळतो. त्‍यामुळे पाकिस्‍तान आणि चीन या दोन शत्रूंसह भारतात असणार्‍या अंतर्गत शत्रूंचाही आपल्‍याला विचार करावा लागेल.

आपली लढाई केवळ पाकिस्‍तानशी नसून तेथे उत्‍पन्‍न झालेल्‍या ‘जिहाद’शी आहे. या जिहादला पाठिंबा देणारे आणि साहाय्‍य करणारे लोक, ‘कम्‍युनिस्‍ट पार्टी ऑफ चायना’, त्‍यांचे माओवादी, तसेच ज्‍यांचे येथील चर्चशी सलोख्‍याचे संबंध आहेत, अशांसह अनेक भारतविरोधी घटकांशी आपल्‍याला लढावे लागत आहेत.’