पुणे – मागील ४ वर्षांपासून विनाअनुमती वास्तव्य करणार्या ७ बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ‘सामाजिक सुरक्षा विभागा’ने ही कारवाई बुधवार पेठेमध्ये धाड घालून केली. या महिलांवर फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या महिलांनी कोणत्याही कागदपत्रांविना भारतामध्ये घुसखोरी केली आहे. त्या वेश्या व्यवसाय करत होत्या.