पिंपरी (पुणे) – श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत ध्वनीप्रदूषणाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याने शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी घेतलेल्या ध्वनीवर्धकांच्या नोंदीची चौकशी करून नियमांचे उल्लंघन केलेल्या मंडळांवर साहाय्यक पोलीस आयुक्त न्यायालयात खटले प्रविष्ट करणार आहेत. पिंपरी पोलीस ठाणे १०, चिंचवड ४, भोसरी ३७, एम्.आय.डी.सी. भोसरी ४, चाकण २, तळेगाव दाभाडे ९, वाकड २१, हिंजवडी १६ आणि निगडी ५ अशा एकूण १०८ मंडळांच्या मिरवणुकीतील ध्वनीवर्धकांच्या आवाजाच्या नोंदी घेतल्या असून साहाय्यक पोलीस आयुक्त या मंडळांचे अन्वेषण करून खटले प्रविष्ट करतील, अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिली.