जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत नवनिर्वाचित अध्यक्षांना डोळा मारला !

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

ओटावा (कॅनडा) – कॅनडाच्या संसदेमध्ये हिटलरच्या नाझी सैन्यातील अधिकार्‍याला आमंत्रित केल्यावरून तत्कालीन अध्यक्ष ऍन्थनी रोटा यांना त्यागपत्र द्यावे लागले होते. त्यानंतर आता नवनिर्वाचित अध्यक्ष ग्रेग फर्गस यांच्या निवडीनंतर पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांचे अभिनंदन करत संसदेमध्ये त्यांना डोळा मारला. त्यांना चूक झाल्याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी जीभ बाहेर काढली. त्यांच्या या हावभावांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर पुष्कळ प्रमाणात प्रसारित होत असून त्यांच्यावर सर्वत्र टीका केली जात आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ग्रेग फर्गस संसदेला संबोधित करत असतांना  ‘आदरणीय पंतप्रधान’ म्हणताच ट्रुडो उभे राहिले आणि त्यांनी वरील ‘मूखर्तापूर्ण व्यवहार’ केला. वर्ष २०१८ मध्ये भारताच्या संसदेमध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागेवर जाऊन त्यांना मिठी मारली होती. त्यानंतर स्वत:च्या जागेवर येऊन त्यांनी त्यांचे काँग्रेसचे तत्कालीन खासदार आणि सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया यांना डोळा मारला होता. तेव्हा गांधी यांच्याही या व्यवहारावरून त्यांचे हसे झाले होते.

संपादकीय भूमिका

इतिहासात जस्टिन ट्रुडो यांची ओळख आतंकवाद्यांना आश्रय देणारे, नाझींचे उदात्तीकरण करणारे, असांस्कृतिक वर्तन करणारे अपरिपक्व नेते म्हणून केली जाईल, हे निश्‍चित !