
होशियारपूर (पंजाब) – येथून १५ किमी अंतरावर असणार्या मेगोवाल गंजियान या गावात शिरोमणी अकाली दलाचे नेते सुरजित सिंह आंखी यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. ग्रामस्थांनी सांगितले की, सुरजित सिंह २८ सप्टेंबरच्या संध्याकाळी गावातील एका किराणा मालाच्या दुकानात उभे होते. या वेळी दुचाकीवरून २ तरुण तेथे आले. तरुणांनी आंखी यांच्या पोटात आणि छातीत गोळ्या झाडल्या. त्यानंतर गोळ्या झाडणारे पळून गेले. आंखी यांना घायाळ अवस्थेत रुग्णालयात नेले असता तेथे त्यांच्यावर उपचार चालू असतांना त्यांचा मृत्यू झाला. पोलीस या हत्येच्या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.
Shiromani Akali Dal leader Surjit Singh shot dead by unknown person in Hoshiarpur village https://t.co/jmZs0wc0Mh
— The Times Of India (@timesofindia) September 29, 2023
मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)