
मुंबई – हिंदु धर्माच्या विरोधात गरळओक करणारे तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भोसले यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. हिंदु धर्म संपवण्याविषयीचे उदयनिधी यांचे वक्तव्य चिथावणीखोर असून राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराची गळचेपी करणारे आहे. हा अजामीनपात्र गुन्हा असून उदयनिधी यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी भोसले यांनी तक्रारीमध्ये केली आहे.
हिंदु संस्कृती किंवा सनातन धर्म पूर्वापार चालत आला आहे. हिंदु धर्माची डेंग्यू, मलेरिया, कोरोना यांच्याशी तुलना करणे, तसेच हिंदु धर्म संपवण्याचे वक्तव्य करणे हे चिथावणीखोर आहे. मी भारताचा नागरिक असून एक हिंदु आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या कृती म्हणजे कृती भारतीय दंड संहितेच्या कलम २९५, तसेच २९५ (अ) प्रमाणे फौजदारी गुन्हा आहे. ‘हा अजामीनपात्र गुन्हा असून उदयनिधी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी प्रभाकर भोसले यांनी तक्रारीमध्ये केली आहे.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !