उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. देवश्री संतोष खटावकर आणि चि. सायेशा गुरुप्रसाद सातपुते या दोघी या पिढीतील आहेत !
‘वर्ष २०२० मध्ये ‘चि. देवश्री संतोष खटावकर उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (४.९.२०२३) |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
श्रावण कृष्ण नवमी (८.९.२०२३) या दिवशी देवद, पनवेल चि. देवश्री संतोष खटावकर हिचा चवथा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई सौ. सुप्रिया संतोष खटावकर यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. देवश्री संतोष खटावकर हिला चवथ्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
१. प्रार्थना
‘चि. देवश्री जेवण्यापूर्वी आणि बाहेर जाताना प्रार्थना करते. खेळतांना, रडतांना आणि मी रागावल्यास ती देवाशी बोलते.
२. सात्त्विकेतेची आवड
तिला ‘आश्रमात जाणे, कुंकू-टिकली लावणे, बांगड्या घालणे, गजरा घालणे, परकर-पोलके आणि ‘फ्रॉक’ घालणे, मंदिरात जाणे, पाया पडणे’ इत्यादी गोष्टी आवडतात.
३. प्रेमभाव
अ. आम्ही गावाहूून येतांना खाऊ किंवा प्रसाद आणला असल्यास ती आमच्या घरी येणार्या आणि घरासमोरून (देवद येथील सनातनच्या आश्रमाजवळच आमचे घर आहे) जाणार्या साधकांना न विसरता देते. एकदा उन्हाळ्यात आम्ही गावाहून येतांना पुष्कळ काकड्या आणल्या होत्या. त्या साधकांना देत असतांना एक काकडी न्यून पडत होती. तेव्हा देवश्री स्वयंपाकघरात येऊन मला म्हणाली, ‘‘एक काकडी दे.’’ मी म्हणाले, ‘‘केवळ एकच काकडी शिल्लक आहे आणि ती मी तुझ्यासाठी ठेवली आहे. त्या काकांना मी दुसरे काहीतरी देते.’’ तेव्हा देवश्री म्हणाली, ‘‘मी बाबांना आपल्यासाठी बाजारातून पुष्कळ काकड्या आणायला सांगीन.’’ असे म्हणून तिने काकडी त्या काकांना नेऊन दिली.
४. आश्रमजीवनाची आवड : ‘आश्रमात अधिक वेळ थांबावे’, यासाठी ती रडते. ती साधकांमध्ये सहज मिसळते.
५. संतांप्रती भाव
ज्या दिवशी आश्रमात जायचे असेल, त्या वेळी झाडाला एखादे फूल लागले असल्यास ते फूूल देवश्री आणि गिरीजा (देवश्रीची मोठी बहीण, वय ६ वर्षे) पू. (सौ.) अश्विनीताईंसाठी (पू. (सौ.)अश्विनी अतुल पवार यांच्यासाठी) ठेवतात आणि त्यांना देतात.
६. आश्रमाच्या चैतन्यमय सान्निध्याने चि. देवश्रीत झालेले पालट
देवश्रीच्या जन्मापासून ते ती ३ वर्षांची होईपर्यंत मी मिरजेला (सासरी) होते. नंतर वर्ष २०२२ मध्ये आम्ही देवद येथील सनातन संकुलात पुन्हा रहाण्यासाठी आलो. तेव्हा देवश्री प्रचंड हट्टी, चिडखोर होती. ती एखाद्या गोष्टीसाठी पटकन् चिडून पुुष्कळ रडत असे; पण कधी प्रेमळ आणि समजंसही वागत असे. तिचा स्वभाव अजूनही क्षणाक्षणाला पालटत असतो. देवदला आल्यावर सनातनच्या आश्रमातील चैतन्याने काही दिवसांतच तिचा हट्टीपणा, किरकिर करणे बर्याच प्रमाणात अल्प झाले आणि प्रेमभाव अन् नम्रता यांमध्ये वाढ झाली.
७. देवश्रीमधील स्वभावदोष
तीव्र अपेक्षा करणे, राग येणे, हट्टीपणा करणे, स्वतःच्या मतावर ठाम रहाणे.
८. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘हे श्रीकृष्णा, तुझ्या कृपेनेच आम्हाला या दैवी बालिकेची सेवा करण्याची आणि तिच्याकडून बरेच काही शिकण्याची संधी मिळाली. देवश्रीच्या समवेत आम्हा सर्वांवर संस्कार करणारा, योग्य मार्ग दाखवणारा तूच आहेस. यासाठी मी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘तूच आमच्याकडून तुला अपेक्षित अशी सेवा आणि साधना करवून घे’, अशी मी आर्त प्रार्थना करते.’
– सौ. सुप्रिया संतोष खटावकर (चि. देवश्री खटावकर हिची आई), देवद, पनवेल. (६.८.२०२३)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |