सातारा, ६ सप्टेंबर (वार्ता.) – जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार झाला. याचा निषेध म्हणून आंदोलने चालू झाली आहेत. या आंदोलनाला सातारा जिल्हा वकील संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे.
सातारा वकील संघटनेच्या वतीने तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत लाठीमाराचा निषेध व्यक्त करण्यात आला, तसेच ‘दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, मराठा आंदोलनकर्त्यांच्या खटल्यात शहरातील वकील विनामूल्य वकीलपत्र प्रविष्ट करणार आहेत’, या आशयाचे निवेदन वकील संघटनेने निवासी उपजिल्हाधिकारी आणि सातारा येथील ‘मराठा क्रांती मोर्चा’चे समन्वयक यांना पत्र देण्यात आले आहे.