विवेक रामास्वामी फार ज्ञानी आणि हुशार व्यक्ती आहेत !

  • डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतीय वंशाचे स्वपक्षातील प्रतिस्पर्धी रामस्वामी यांचे कौतुक !

  • ट्रम्प यांच्याप्रमाणेच रामस्वामी राष्ट्राध्यक्षपाच्या उमेदवारीचे दावेदार !

विवेक रामास्वामी

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्याच पक्षाचे भारतीय वंशाचे नेते विवेक रामस्वामी यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, ‘विवेक रामास्वामी हे एक फार ज्ञानी आणि हुशार व्यक्ती आहेत. त्यांच्यामध्ये उत्साह आणि ऊर्जा आहे. हे निश्‍चित उपराष्ट्राध्यक्ष म्हणून चांगले काम करू शकतील.’

विशेष म्हणजे रामस्वामी हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून ट्रम्पही यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी रामस्वामी यांचे केलेल्या कौतुकाविषयी आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच ट्रम्प यांनी रामस्वामी यांना उपराष्ट्रपतीपदासाठी शुभेच्छा दिल्याने ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यास ते रामास्वामी यांना उपराष्ट्रपती करू शकतात, असे सांगितले जात आहे.