जर मला शक्य झाले, तर मी हिंदूंना ठार मारीन ! -पाकमधील विद्यार्थ्याचे विधान

पाकमधील इयत्ता ९ वीतील विद्यार्थ्याचे विधान !

कराची (पाकिस्तान) – मी मुसलमानांसमवेत अन्याय करणार नाही; मात्र हिंदूंना सोडणार नाही. जर मला शक्य झाले, तर मी हिंदूंना ठार मारीन, असे हिंदुद्वेषी विधान इयत्ता ९ वीमध्ये शिकणार्‍या पाकमधील एका मुसलमान मुलाने केलेे. ‘यु ट्यूब चॅनल’ असणार्‍या मुनिर कासिम यांनी हा व्हिडिओ बनवला आहे. ‘हिंदूंनी इस्लाम स्वीकारला पाहिज. तर त्यांनी तो स्वीकारला नाही, तर त्यांना ठार मारले पाहिजे’, असेही या मुलाने म्हटले आहे.

सौजन्य : Qasim Munir

कासिम मुनीर हे पाकमधील नागरिकांचे पाकव्याप्त काश्मीर आणि भारताकडील काश्मीर यांच्या स्थितीविषयी मत घेत होते. त्या वेळी या मुलाने ही विधाने केली. कासिम मुनीर यांनी या मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला.

संपादकीय भूमिका

यातून पाकमधील मुलांना शाळेत काय शिकवले जाते ?, ते लक्षात येते !