इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडले !
बीड – येथील अंबाजोगाई येथे एका २६ वर्षीय हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून बळजोरीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावला. तिच्यावर बलात्कार केला आणि मारहाण केली. त्यानंतर तिला पुणे येथील आमीर तांबोळी याच्याशी विवाह करण्यास बळजोरी केली. या प्रकरणी अंबाजोगाई पोलिसांनी आमीर तांबोळी आणि त्याचे साथीदार नंदिनी बॅनर्जी, अधिवक्ता अरशद नेहाल आणि आसिफ यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंद केला आहे. या सर्वांनी तिचे धर्मांतर करण्यामध्ये साहाय्य केले आहे. युनानी औषधे देऊन तरुणीला नग्न ‘व्हिडिओ कॉल’ करण्यासाठी बळजोरी केली, तसेच पीडितेला ‘ब्लॅकमेल’ करून ६ लाख रुपये लुटले. आमीर तांबोळी याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तरुणीने तक्रारीत सांगितले आहे. गेल्या २ वर्षांत आमीरने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. आसिफवर तांबोळी यांना युनानी औषधे पुरवल्याचा आरोप आहे.
१. पीडितेने वर्ष २०२१ मध्ये अंबाजोगाई येथे ऑनलाईन नोकरीसाठी अर्ज केला होता. पीडितेची आमीर तांबोळी याने नोकरीसाठी मुलाखत घेतली. त्यानंतर त्याने नंदिनीच्या साहाय्याने पीडितेशी जवळीक साधून तिला पुणे येथे कार्यालयात नोकरीसाठी बोलावले. पीडितेला कार्यालयात नशेची औषधे दिली.
२. त्यानंतर तांबोळी आणि नंदिनी यांनी पीडितेला इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केले. त्यांनी तिच्यासमोर हिंदु धर्माचाही अपमान केला आणि ‘इस्लाम हा सर्व धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे’, असे मानायला लावले. त्याच वेळी नंदिनीनेही हिंदु धर्म सोडून इस्लाम स्वीकारल्याचे पीडितेला सांगण्यात आले. ‘इस्लाममध्ये मुली सुरक्षित आहेत आणि मुसलमान महिलांवर कधीही बलात्कार होत नाही’, असा विश्वास हिंदु पीडितेला दिला.
३. जून २०२२ मध्ये तांबोळी आणि नंदिनी यांनी तरुणीला आमीर तांबोळीशी बळजोरीने विवाह करण्यास भाग पाडले. विवाहानंतर पीडित मुलीचे नाव ‘खदिजा’ ठेवण्यात आले. तिची कायदेशीर कागदपत्रे पालटून तिला नवीन ‘सीमकार्ड’सहित भ्रमणभाष दिला. आरोपी आमीरने याच ‘सीमकार्ड’चा वापर अधिवक्ता अरशद नेहल याच्याशी बोलण्यासाठी केला. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे तो काही आंतरराष्ट्रीय ‘कॉल’ही करत असे.
४. जुलै २०२३ मध्ये मुलीच्या पालकांनी आपल्या मुलीला परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले; मात्र पुणे न्यायालयात मुलीने तिच्या आई-वडिलांसह जाण्यास नकार दिला.
२० ऑगस्ट २०२३ या दिवशी प्रविष्ट केलेल्या तक्रारीत मुलीने सांगितले की, तिने भीतीपोटी आणि औषधांच्या प्रभावाखाली पुणे न्यायालयात तसा जबाब दिला होता. तिला ‘ब्लॅकमेल’ करण्यात आले होते. जेव्हा पीडितेला दिलेल्या युनानी औषधांचा परिणाम संपला, तेव्हा तांबोळी याने तिचे ‘ब्रेनवॉश’ करून तिला धर्मांतर करण्यास भाग पाडले, हे सत्य समोर आले. (धर्मांध किती खालच्या थराला जाऊन हिंदु मुलींना त्यांच्या जाळ्यात ओढतात, हे लक्षात येते. हिंदु मुलींनी कोणत्याही परिस्थितीत धर्मांधांपासून दूरच रहायचे आहे, हे या उदाहरणातून शिकायला हवे ! – संपादक)
संपादकीय भूमिका :
|