लडाख – येथे १९ ऑगस्टच्या सायंकाळी सैन्याचे वाहन खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ९ सैनिकांचा मृत्यू झाला. मृत सैनिकांमध्ये एका अधिकार्याचाही समावेश आहे. काही सैनिक घायाळही झाले आहेत. भारतीय सैनिक कारू गॅरिसन येथून लेहजवळील क्यारी शहराकडे जात होते. त्या वेळी ही घटना घडली.
लद्दाख में बड़ा हादसा, सेना का एक ट्रक खाई में गिर गया जिससे 9 जवानों की जान चली गई#Ladakh #accident #army | @ashraf_wani https://t.co/0yW1kaRQdm
— AajTak (@aajtak) August 19, 2023
या अपघाताविषयी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. सिंह यांनी ट्वीट करत म्हटले, ‘लडाखमध्ये लेहजवळ झालेल्या भारतीय सैनिकांच्या मृत्यूने मी दु:खी झालो आहे. देशाप्रती त्यांनी दिलेले योगदान कुणीही विसरणार नाही. सैनिकांच्या कुटुंबाप्रती माझ्या सहवेदना आहेत. घायाळ सैनिकांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, यासाठी प्रार्थना करत आहे.’
Saddened by the loss of Indian Army personnel due to an accident near Leh in Ladakh. We will never forget their exemplary service to our nation. My thoughts are with the bereaved families. The injured personnel have been rushed to the Field Hospital. Praying for their speedy…
— Rajnath Singh (@rajnathsingh) August 19, 2023