भगवान श्रीकृष्ण त्यांच्या जन्मस्थानी भव्य स्वरूपात स्थानापन्न होतील ! – श्री धीरेंद्र शास्त्री

मथुरा (उत्तरप्रदेश) –  लवकरच भगवान श्रीकृष्ण त्यांच्या जन्मस्थानी भव्य स्वरूपात स्थानापन्न होतील. तसेच आगराच्या जामा मशिदीत डांबून ठेवलेली भगवान श्रीकृष्णाची मूर्तीही लवकरच बाहेर येईल, असे वक्तव्य बागेश्‍वर धामचे अध्यक्ष श्री धीरेंद्र शास्त्री यांनी येथे आले असता केले.


धीरेंद्र शास्त्री यांनी ठाकूर देवकीनंदन महाराजांच्या मंदिरात चालू असलेल्या १ कोटी २५ लाख पार्थिव शिवलिंग निर्मिती कार्यक्रमात भाग घेतला. या वेळी त्यांनी श्री भोलेनाथाची विधीवत् पूजाही केली. वृंदावनच्या बांकेबिहारींनी सर्वांवर लक्ष ठेवावे, अशी प्रार्थनाही त्यांनी या वेळी केली.