शिमला (हिमाचल प्रदेश) – येथे अज्ञातांनी श्री भुतेश्वर मंदिराच्या पुजार्याची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर मृतदेह मंदिराजवळील झुडपात फेकून देण्यात आला. पुजारी मार्च २०२१ पासून मंदिरातच बांधलेल्या एका खोलीत रहात होते. सुनील दास असे या पुजार्याचे नाव असून तेे महाराष्ट्रातील रहिवासी होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. शिमला पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध चालू केला आहे.
शिमला में अपराधियों ने दुस्साहस दिखाते हुए मंदिर के पुजारी की बेरहमी से हत्या कर शव को मंदिर के पास झाड़ियों में फेंक दिया।#murdershimlahttps://t.co/RwXZeecePv
— Amar Ujala Himachal (@AUHimachal) August 13, 2023
पुजारी दास हे ८ ऑगस्ट या दिवशी संशयास्पदरित्या बेपत्ता झाले होते. १२ ऑगस्टला त्यांचा मृतदेह मंदिरापासून १५ मीटर अंतरावर झुडपात पडलेला आढळून आला. मृत पुजार्यांच्या शरिरावर जखमेच्या खुणा होत्या. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आला. ‘या प्रकरणाचे अन्वेषण चालू असून लवकरच मारेकर्यांना अटक करण्यात येईल’, असे पोलिसांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाभारतात हिंदूंचे संत-महंत, पुजारी हे असुरक्षित आहे, हे संतापजनक ! |