|
वाराणसी (उत्तरप्रदेश) – वाराणसी जिल्हा न्यायालय, अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या अनुमतीनंतर ४ ऑगस्टपासून प्रारंभ झालेल्या येथील ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाच्या आजच्या दुसर्या दिवशी मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील महिला याचिकाकर्त्यांचे अधिवक्ता सुधीर त्रिपाठी यांनी सांगितले, ‘येथील नंदीजवळ व्यासजी यांचे तळघर आहे. ते आज उघडण्यात आल्यावर तेथे मूर्ती सापडली आहे.’ येथे ५ कलश आणि कमळ यांच्या आकृत्याही आढळून आल्याचे सांगितले जात आहे.
ज्ञानवापी परिसर के ASI सर्वे का आज दूसरा दिन, मस्जिद के तहखाने में पहुंची टीम, अब हिंदू पक्ष ने किया बड़ा दावा#Gyanvapi #ASI #ASISurveyhttps://t.co/DCA4sMvfti
— ABP News (@ABPNews) August 5, 2023
१. याचिकाकर्त्या सीता साहू यांनी सांगितले की, येथे ४ फूट उंचीची एक खंडित मूर्ती मिळाली आहे. या मूर्तीमध्ये अर्धे शरीर मनुष्याचे, तर अर्धे पशूचे आहे. याला नरसिंहाची मूर्ती म्हटले जात आहे. तसेच येथे तुटलेल्या खांबांचे अवशेषही मिळाले आहेत. तसेच २ फुटांचे त्रिशूळ आणि ५ कलश सापडले आहेत. येथील भागाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
२. अन्य एक याचिकाकर्त्या राखी सिंह यांचे अधिवक्ते अनुपम द्विवेदी यांनी सांगितले की, आजच्या सर्वेक्षणामध्ये मुसलमान पक्षाकडून सहकार्य केले जात आहे. पुरातत्व विभाग बारकाईने सर्वेक्षण करून नोंदी ठेवत आहे. नंदीसमोरील तळघरामध्ये अस्वच्छता होती. तेथे स्वच्छता करण्यात आली. यंत्राद्वारे ज्ञानवापी परिसराची त्रिमितीय प्रतिमा घेतली जात आहे.
३. ज्ञानवापीचे सर्वेक्षण सकाळी ७ ते दुपारी साडेबारापर्यंत झाल्यानंतर पुन्हा दुपारी अडीच नंतर सायंकाळी ५ पर्यंत करण्यात आले. पुरातत्व विभागाचे ६१ जण या सर्वेक्षणात सहभागी झाले आहेत. सर्वेक्षणाच्या वेळी ज्ञानवापीच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
४. तळघराची चावी देण्यास प्रथम मुसलमान पक्षाने नकार दिला होता; मात्र प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर चावी देण्यात आली. त्यानंतर तळघर उघडण्यात आले.

तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष
Ram Mandir Donation Scam : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी नवीन विशेष अन्वेषण पथकाची स्थापना
UP Conversion Racket : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – धर्मांतर करणार्या टोळीतील ७ जणांना अटक !