तिसगाव (जिल्हा अहिल्यानगर) – येथे १२ जुलै या दिवशी एका विद्यालयात अकरावीत शिकणार्या विद्यार्थिनीची सैबाज पठाण याने तिच्या वर्गात घुसून छेड काढली. सैबाज पठाण याच्या विरोधात संबंधित मुलीच्या कुटुंबियांनी पाथर्डी पोलिसात तक्रार प्रविष्ट केली असून इतर मुलींच्या संदर्भात असे प्रकार घडू नयेत; म्हणून कुठल्याही प्रकारे या गुन्ह्यात मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. यामुळे सैबाजवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे; मात्र १३ जुलैला उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती, असे संबंधित मुलीच्या कुटुंबियांनी सांगितले. (असे पोलीस जनतेचे रक्षण करण्यास लायक आहेत का ?- संपादक) तिसगाव येथे बाहेरगावच्या मुलींना या टवाळखोरांचा नेहमीच त्रास सहन करावा लागतो; परंतु काही दिवसांनी प्रकरण मिटवले जात असल्याने या टवाळखोरांचे धाडस वाढत चालले आहे.
मुस्लिम तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून कॉलेज समोर रोज मुलींची छेड काढतो पण तो आणि त्याची मुस्लिम गँग गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याने पालक मुलींना शाळेत पाठवनेच बंद करतात,हा प्रकार सर्रास चालू आहे तिसगाव पंचक्रोशीत. pic.twitter.com/FCH1NSuqzw
— देशभक्त नागरिक (@ivikasrb) July 2, 2023
तिसगाव व्यापारी बाजारपेठेचे शहर असून आता शहराची ओळख मुलींच्या छेडछाडीचे ठिकाण म्हणून होत चालली आहे. मागील आठवड्यात हनुमान टाकळी येथील २ मुलींची भर रस्त्यावर एका धर्मांधाने छेड काढली होती. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी, तसेच तिसगावसह परिसरातील तरुणांनी मूक मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध केला होता. लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करण्यापर्यंत टवाळखोरांचे धाडस वाढले असेल, तर अशा टवाळखोरांना कुणी राजकीय स्वार्थासाठी पाठीशी घालत आहे का ? कुणाच्या जिवावर इतके मोठे धाडस त्यांनी केले, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
संपादकीय भूमिकावर्गात घुसून विद्यार्थिनीची छेड काढण्यापर्यंत धर्मांधांची मजल जाते, यावरून तिसगाव भारतात आहे कि पाकिस्तानात ? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. धर्मांधांचा वाढता उद्दामपणा मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता प्रामाणिकपणे दायित्व निभावणे आवश्यक आहे. |