जमशेदपूर (झारखंड) येथील शाळेत मुसलमान विद्यार्थिनीने हिंदु विद्यार्थिनीला खाऊ घातले गोमांस !

तक्रारीनंतर मुसलमान विद्यार्थिनीची शाळेतून हकालपट्टी !

जमशेदपूर (झारखंड) – येथील मानगो भागात असणार्‍या ‘सिंबोसिस पब्लिक स्कूल’ या शाळेत एका मुसलमान विद्यार्थिनीनी तिच्या ४ थीमध्ये शिकणार्‍या हिंदु मैत्रिणीला गोमांस खाऊ घातले. या प्रकरणी हिंदु विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळेच्या प्रशासनाकडे तक्रार केली आहे. यानंतर प्रशासनाने संबंधित मुसलमान विद्यार्थिनीला शाळेतून काढून टाकले आहे. हिंदु विद्यार्थिनीला गोमांस खाऊ घातल्याची स्वीकृती मुसलमान विद्यार्थिनीने दिली आहे. याविषयी मुसलमान विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळेत येऊन क्षमायाचना केली.

संपादकीय भूमिका

अशी वृत्ती मुसलमान विद्यार्थिनीमध्ये कशी निर्माण झाली ?, याचा शोध सरकार घेणार का ?