१. प.पू. भक्तराज महाराज यांना विचारलेले प्रश्न

‘एकदा मी सूक्ष्मातून रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात गेले आणि प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या चरणी भावपूर्ण नमस्कार केला. नंतर मी प.पू. भक्तराज महाराज यांना विचारले, ‘प.पू. बाबा, जीव जन्माला आल्यावर त्याच्याकडून कितीही चुका झाल्या, तरी देव त्याच्या कर्माकडे साक्षीभावाने कसा पहातो ? त्याच्या कल्याणाचाच विचार कसा करतो आणि त्याची साधना कशी करून घेतो ?’
२. प.पू. भक्तराज महाराज यांनी दिलेले उत्तर !
जन्मा येऊनी आठव श्री गुरुचरण ।
प्रारब्ध भोगूनी होई नराचा नारायण ।
कर्मबंधनातून सुटका हीच असे खूण ॥
सन्मुख असे भगवंत करण्या मोक्ष प्रदान ।
जन्मा येऊनी आठव श्री गुरुचरण ॥ १॥
कृतज्ञता वाटण्या असे कष्टप्रद जीवन ।
मुमुक्षत्वे पाही हृदयगुरु, हीच त्याची खूण ।
संचित, प्रारब्ध जसे, तसेच क्रियमाण ।
जन्मा येऊनी आठव श्री गुरुचरण ॥ २॥
प.पू. भक्तराज महाराजांनी मला जे उत्तर सांगितले, ते ऐकून माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि माझ्याकडून भावरूपी कृतज्ञता व्यक्त झाली.
३. प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी व्यक्त केलेली काव्यपुष्परूपी कृतज्ञता !
शब्द हे दिले, तव कृपा असे निरंतर ।
भावजागृतीतून दिले, सदैव अनुसंधान ।
काही मागणे नको, दिले छत्ररूपी पांघरूण ।
अल्पबुद्धी मी, ठेवले श्री गुरुचरणी मन ।
जन्मा येऊनी आठवू दे, केवळ श्री गुरुचरण ॥
श्री गुरुचरणी कोटीश: कृतज्ञ!’
– श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी (वय ७३ वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा.
|
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
देवाची आवड असणार्या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !