राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांचे कारवाई करण्याचे आदेश !

अहिल्यानगर – येथील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव इथे अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला मारहाण केल्याची घटना घडली आहे. (मुलींनी संकटाला सामोरे जाण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम होणे आवश्यक आहे ! – संपादक) या प्रकरणी रफिक उपाख्य लाल्या पठाण याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याने याआधीही मुलींची छेड काढली होती; मात्र त्या वेळी वाद स्थानिक पातळीवर मिटवण्यात आला होता. तरीही आरोपीने पुन्हा भररस्त्यात मुलींची छेड काढली आहे. (धर्मांधांना वेळीच कठोर शिक्षा न केल्याचा परिणाम ! – संपादक) बसस्थानकाजवळच आरोपीने २ बहिणींची छेडछाड केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर प्रसारित झाला होता. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे, तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनीही या प्रकरणाची नोंद घेत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
संतापजनक! दिवसाढवळ्या मुलींची छेडछाड, नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगावमधील व्हिडीओ व्हायरल; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली चौकशीची मागणी #ViralVideos #saamanaonline pic.twitter.com/RW9QkuuGaH
— Saamana (@SaamanaOnline) July 3, 2023
सौ. रूपाली चाकणकर यांनी सांगितले की, भरदिवसा रस्त्यात मुलींना असा त्रास देण्याचा प्रकार गंभीर आणि मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. या व्हिडिओची नोंद घेत राज्य महिला आयोगाने नगरचे पोलीस अधीक्षक यांना तातडीने चौकशी करून वस्तूस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
संपादकीय भूमिका :
|
थोडक्यात महत्त्वाचे : (२०.०६.२०२६)
मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास १५ ऑगस्टनंतर अमराठी रिक्शा-टॅक्सी चालकांवर कारवाई !
पार्थ रुग्णालयाच्या आधुनिक वैद्या संगीता गायकवाड यांना अटक
वारकरी महिलांसाठी प्रथमच निवार्यासाठी जर्मन हँगरसह अन्य सुविधा !
महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षेसाठीही कठोर निर्बंध !