सौदी अरेबियाने एकाच वेळी ५ गुन्हेगारांना दिली फाशी !

दुबई – सौदी अरेबियाने एकाच वेळी ५ गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली. या वर्षातील ही सर्वांत मोठी सामूहिकरित्या दिलेली फाशीची शिक्षा आहे. फाशी दिलेल्यांमध्ये ४ सौदी अरेबिया आणि १ इजिप्तचा नागरिक आहे. या सर्वांचा धार्मिक स्थळावरील प्राणघातक आक्रमणात सहभाग असल्याचे आढळून आले होते. या आक्रमणात ५ जण ठार झाले होते आणि अनेक लोक घायाळ झाले होते. पाच जणांना सामूहिक फाशी दिल्याने सौदी अरेबियाने या वर्षात एकूण फाशी दिल्याची संख्या ६८ झाली आहे.

१. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सौदी अरेबियाने गेल्या वर्षी एकूण १४७ जणांना फाशी दिली होती, तर २०२१ मध्ये ६९ जणांना फाशीची शिक्षा दिली होती.

२. सौदी अरेबियाचे राजे सलमान यांचे पुत्र युवराज महंमद बिन सलमान यांनी मोठ्या सामाजिक आणि आर्थिक पालटांच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केल्यामुळे सौदी अरेबियामध्ये फाशीच्या शिक्षेत वाढ झाली आहे. त्यांनी म्हटले होते की, जर एखाद्या व्यक्तीने लोकांचा जीव धोक्यात आणला, तर त्याला फाशीची शिक्षा दिली जाईल.

संपादकीय भूमिका 

सौदी अरेबिया गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावतो आणि ती कार्यान्वितही करतो. भारतात मात्र फाशीची शिक्षा सुनावूनही संबंधितांना फाशी दिली जात नाही, हे लज्जास्पद होय !