‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या नखांपेक्षा त्यांच्या केसांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक असणे’, हे त्यांचे हिंदु राष्ट्र-स्थापनेचे महान अवतारी कार्य लवकरच पूर्णत्वाला जाणार असल्याचा संकेत असणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे केस आणि नखे यांच्या संदर्भात ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

‘गत काही वर्षांपासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले त्यांचे केस अन् नखे संशोधनासाठी देत आहेत. पूर्वी ते वर्षातून १-२ वेळाच त्यांचे केस अन् नखे संशोधनासाठी देत असत; पण वर्ष २०२१ पासून मात्र त्यांनी वर्षातून ३-४ वेळा ते संशोधनासाठी देण्यास आरंभ केला. ‘त्यांचे केस आणि नखे यांच्यातील सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे जानेवारी २०२३ पासून हे प्रमाण विलक्षण वाढले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांचे केस आणि नखे यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

टीप १ – केस अन् नखे यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोजण्यासाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. जुलै २०२२ पासून या उपकरणाद्वारे केस अन् नखे यांची प्रभावळ मोजतांना ती २,३३७ मीटरपेक्षा अधिक असल्याचे लक्षात आले. ती अचूक मोजण्यासाठी मागे जाणे जागेअभावी शक्य नव्हते. त्यामुळे ती अचूक मोजण्यासाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला.

टीप २ – ज्या मासातील केस किंवा नखे चाचणीसाठी उपलब्ध नाहीत, तेथे ‘-’ असे लिहिले आहे.

वरील निरीक्षणांतून पुढील सूत्रे लक्षात आली.

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या नखांतील सकारात्मक ऊर्जेचे (चैतन्याचे) प्रमाण प्रतिवर्षी उत्तरोत्तर पुष्कळ प्रमाणात वाढत जाणे

सौ. मधुरा कर्वे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे केस अन् नखे यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत प्रत्येक मासागणिक वाढ झाली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये त्यांच्या नखांतील सकारात्मक ऊर्जा ६६५ ते ९५६ मीटर होती. जुलै २०२२ मध्ये ती ५ सहस्र मीटरपेक्षाही अधिक झाली. ऑगस्ट २०२२ मध्ये नखांतील सकारात्मक ऊर्जेत भरीव वाढ होऊन ती १५ ते ३० सहस्र मीटरपेक्षाही अधिक झाली. जानेवारी २०२३ पासून त्यांच्या नखांतील सकारात्मक ऊर्जेत विलक्षण वाढ होऊन ती मार्चमध्ये ४४ ते ८१ सहस्र मीटर झाली. यातून ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे अवतारी कार्य आता सगुण स्तरावर प्रगट होत आहे’, असे जाणवते.

२. ऑक्टोबर २०२२ पासून सच्चिदानंद परब्रह्मडॉ. आठवले यांच्या उजव्या हाता-पायांच्या नखांपेक्षा त्यांच्या डाव्या हाता-पायांच्या नखांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक असणे

हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचे कारण हे की, मे २०२१ पर्यंत त्यांच्या नखांच्या केलेल्या निरीक्षणांच्या हे अगदी उलट आहे. मे २०२१ पूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या डाव्या हाता-पायांच्या नखांपेक्षा त्यांच्या उजव्या हाता-पायांच्या नखांमध्ये अधिक सकारात्मक ऊर्जा आढळून येत असे. शरिराची उजवी बाजू सूर्यनाडीशी, तर डावी बाजू चंद्रनाडीशी संबंधित आहे. सूर्यनाडी तेजस्वी, मारक अन् प्रभावी असून रक्षणाचे कार्य, तर चंद्रनाडी शीतल अन् तारक असून पोषणाचे कार्य करते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या उजव्या हाता-पायांतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे समष्टीचे रक्षण होते आणि त्यांच्या डाव्या हाता-पायांतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे समष्टीचे पोषण होते. कोणतीही घटना आधी सूक्ष्मातून घडते आणि काही काळाने ती स्थुलातून घडते. या तत्त्वानुसार सूक्ष्मातील देवासुर संग्राम संपत आला, तसे आपत्काळाच्या रूपाने त्याचे स्थुलातून प्रकटीकरण चालू झाले. ‘ऑक्टोबर २०२२ पासून परात्पर गुरु डॉक्टरांच्या उजव्या हाता-पायांच्या नखांपेक्षा त्यांच्या डाव्या हाता-पायांच्या नखांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक असणे, हे त्यांचे अवतारी कार्य पूर्ण होऊन हिंदु राष्ट्राची पहाट सूक्ष्मातून झालेली आहे, आता केवळ ती स्थुलातून होणे शेष आहे’, याचे द्योतक आहे. त्यामुळे आपत्काळ सरला की, हिंदु राष्ट्र येणारच आहे. हे लक्षात घेऊन साधकांनी आपत्काळाला घाबरून न जाता, श्रीगुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांनी  आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी शारिरीक, मानसिक अन् आध्यात्मिक स्तरावर जे प्रयत्न करायला साधकांना सांगितले आहेत, ते नेटाने करणे अपेक्षित आहे.

३. जानेवारी २०२३ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या नखांपेक्षा त्यांच्या केसांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक असणे

केस हे पृथ्वीतत्त्वाशी, तर नखे ही तेजतत्त्वाशी संबंधित आहेत. नखांपेक्षा केसांतून अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे, हे तीव्र आपत्काळ जवळ आल्याचे द्योतक आहे. आपत्काळ संपल्यावर येणारा काळ म्हणजे हिंदु राष्ट्राची पहाट होय. या गोष्टी स्थुलातून घडायला थोडीच वर्षे शेष आहेत. थोडक्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे हिंदु राष्ट्र स्थापनेचे महान अवतारी कार्य लवकरच पूर्णत्वाला जाणार असल्याचा हा संकेत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे या अलौकिक सेवेची संधी मिळाली आणि त्यांनीच ती करवून घेतली यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ (१०.६.२०२३)

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

इ-मेल : [email protected]           

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक