|
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – प्रत्येक वेळी हिंदूंच्या सहिष्णुतेची परीक्षा का घेतली जाते ? सुदैवाने त्यांनी (हिंदूंनी) चित्रपटाचा विरोध करतांना कायदा मोडला नाही, अशा कठोर शब्दांत ‘आदिपुरुष’ चित्रपटावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने चित्रपटाच्या निर्मात्यांना फटकारले. या चित्रपटातील आक्षेपार्ह संवादांच्या प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हे मत व्यक्त केले. न्यायालयाने चित्रपटाचे सहलेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांना या खटल्यात पक्षकार म्हणून उभे करण्याचे निर्देश दिले. त्यांना नोटीस बजावण्यासमवेतच आठवड्याभरात उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
सख्त टिप्पणी करते हुए हाई कोर्ट ने कहा कि हिंदू सहिष्णु हैं लेकिन क्यों हर बार उनकी सहनशीलता की परीक्षा ली जाती है? #Adipurush #HighCourt https://t.co/Zi1HX17WC1
— India TV (@indiatvnews) June 27, 2023
न्यायालयाने संताप व्यक्त करतांना केलेल्या टिपण्या !
१. जे सज्जन आहेत त्यांना दाबणे योग्य आहे का ? हे चांगले आहे की, हे अशा धर्माविषयी आहे ज्याच्या अनुयायांनी सार्वजनिक सुव्यवस्थेची कोणतीही समस्या निर्माण केली नाही. आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. आम्ही बातम्यांमध्ये पाहिले की, काही लोक चित्रपटगृहांमध्ये गेले आणि तिथे जाऊन लोकांना चित्रपट बंद करायला लावला. या वेळी ते आणखीही काही करू शकत होते.
२. ज्या पद्धतीने हा चित्रपट बनवला आहे त्याविषयी ही याचिका आहे. काही धर्मग्रंथ आहेत, जे पूजनीय आहेत. अनेक जण घरातून बाहेर पडण्यापूर्वी ‘श्रीरामचरितमानस’ वाचतात. याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, चित्रपटात श्रीरामाची कथा पूर्णपणे पालटण्यात आली आहे. धर्माची खिल्ली उडवली आहे.
३. सेन्सॉर बोर्डाने त्याचे दायित्व पार पाडले आहे का? हनुमान आणि माता सीता यांना अयोग्य पद्धतीने दाखवून समाजाला काय संदेश द्यायचा आहे ? भगवान हनुमान, भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांना असे चित्रित करण्यात आले की, जणू ते काहीच नव्हते.
४. सॉलिसिटर जनरलकडून उत्तर मागतांना न्यायालयाने म्हटले की, ही गंभीर गोष्ट आहे. तुम्ही सेन्सॉर बोर्डाला विचारू शकता की, हे कसे केले गेले ?; कारण राज्य सरकार या प्रकरणात काहीही करू शकत नाही.
५. चित्रपटाच्या कथेविषयी ‘डिस्क्लेमर’ (चित्रपटातील घटनांच्या तथ्यांविषयीचे स्पष्टीकरण देणारी चौकट) जोडण्यात आल्याच्या चित्रपट निर्मात्यांच्या म्हणण्यावर न्यायालयाने म्हटले की, डिस्क्लेमर दाखवणारे लोक देशवासीय आणि तरुण यांना मूर्ख समजतात का ? तुम्ही राम, लक्ष्मण, भगवान हनुमान, रावण, लंका दाखवता आणि मग म्हणता की ‘हे रामायण नाही?’
संपादकीय भूमिकान्यायालयाने फटकारण्यासह संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचाही आदेश द्यावा, जेणेकरून पुढे अशा प्रकारचे हिंदूंच्या देवतांचा, धर्मग्रंथांचा अवमान करण्यास कुणाचे धाडस होणार नाही, असे हिंदूंना वाटते ! |