पंढरीच्या वारीत वृद्ध मुसलमानाकडून वारकर्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न !

पुणे – चालू असलेल्या आषाढी वारीत एके ठिकाणी एक मुसलमान वृद्ध व्यक्ती वारकर्यांमध्ये येते आणि त्यांचा विठ्ठलनामाचा गजर करण्याऐवजी अल्लाचा गजर करण्याविषयी बुद्धीभेद करत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. त्यासाठी मुसलमान व्यक्ती ‘अल्ला खिलावे, अल्ला पिलावे’ या वाक्याला अभंगाप्रमाणे चाल लावते आणि भोळ्याभाबड्या वारकर्यांना त्याच्या पाठोपाठ अल्लाचा गजर करण्यास सांगते. ही मुसलमान व्यक्ती वारकर्यांना म्हणते, ‘‘ज्या वेळी तुकाराम महाराज यांची पालखी निघाली होती, तेव्हा तुकाराम महाराज यांनी अभंग म्हटला होता. त्यात ते म्हणाले होते, ‘अल्ला देवे, अल्ला दिलावे.’ दुर्दैव म्हणजे वारकरीही त्या मुसलमानाच्या बोलण्याला भुलतात आणि ज्या टाळा-मृदंगाच्या गजरात ‘ग्यानबा तुकाराम’, अस नामगजर केला जातो, त्या सुरात आणि टाळ- मृदंगाच्या गजरात ‘अल्ला देवे, अल्ला दिलावे, अल्ला खिलावे, अल्ला पिलावे, अल्ला बिगर ना कोई, अल्ला दारुल दाता, अल्ला बिगर ना कोई, अल्ला करे सो होई’, असे म्हणतांना दिसत आहेत. यातून वारीतही मुसलमानांनी धर्मांतराचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.
सौजन्य शिवशाही
सध्या मुसलमान येनकेन प्रकारेण धर्मांतरासाठी निरनिराळे मार्ग शोधत आहेत, ज्यातून लव्ह जिहाद, लँड जिहाद, थूक जिहाद, हलाल जिहाद यांसारखी प्रकरणे समोर आली आहेत. यातून पंढरपूरची वारीही सुटलेली नाही. आता या भोळ्याभाबड्या भक्ती सोहळ्याचा अपलाभ घेण्याचा प्रयत्न मुसलमान करू लागले आहेत. याचाच पुरावा सामाजिक माध्यमांतून समोर आला आहे.
संपादकीय भूमिकाअसा प्रकार कधी हिंदूंनी मुसलमानांच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये केला आहे का ? समस्त हिंदूंना धर्मशिक्षण दिल्यास असे प्रकार करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही ! |
लोहगडावरील मृत्यू घातपातच !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद