कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवाद्याची हत्या !

खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर

ओटावा (कॅनडा) – ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या आतंकवादी संघटनेचा प्रमुख हरदीपसिंह निज्जर याची कॅनडातील एका गुरुद्वाराजवळ अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. निज्जर कॅनडामध्ये राहून बराच काळ पंजाबमधील खलिस्तानी आतंकवादाला खतपाणी घालत होता. निज्जर येथील गुरुद्वाराचा प्रमुख होता. ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याच्या तो जवळचा होता.

सप्टेंबर २०२० मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने निज्जरला आतंकवादी घोषित केले होते. यानंतर निज्जरची जालंधरच्या भरसिंह पुरा गावातील संपत्तीही जप्त करण्यात आली होती. निज्जरने याच गावातील पुजार्‍याची हत्या केली होती. एन्.आय.ए.ने निज्जरवर १० लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले होते.