मणीपूरमध्ये पुन्हा चालू झालेल्या हिंसाचारात १ जण ठार !

इंफाळ – राज्यात ख्रिस्ती असणारे कुकी आणि हिंदु असणार्‍या मेईतेई या समुदायांमध्ये मे मासापासून हिंसाचार चालू आहे. १२ जून या दिवशी या २ समूदायांमध्ये पुन्हा गोळीबार झाला. या गोळीबारात १ कुकी नागरिक ठार झाला, तर १० जण घायाळ झाले. हिंसाचारामुळे राज्यात इंटरनेटवर असलेली बंदी १५ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

मणीपूरमध्ये ४२ दिवसांपासून चालू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १०० हून अधिक लोक ठार झाले असून ३२० जण घायाळ झाले आहेत. या हिंसाचारामुळे निराधार झालेल्या ४७ सहस्रांहून अधिक लोकांना २७२ साहाय्य छावण्यांमध्ये रहावे लागत आहे.