गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात क्रूरकर्मा आणि हिंदुद्वेषी मोगल बादशाह औरंगजेबाचे उदात्तीकरण चालू आहे. ‘भ्रमणभाषला औरंगजेबाचे स्टेटस ठेवणे, मिरवणुकीत औरंगजेबाचे चित्र झळकवणे’, हे प्रकार उघडपणे चालू आहेत. यातच एखाद दुसर्या मुसलमानाने नव्हे, तर त्या समाजाचे नेतृत्व करणार्यांनीही औरंगजेबाचे समर्थन केले. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी तर ‘मी औरंगजेबाच्या समवेत आहे’, असे घोषित केले. मुसलमानांना अल्पसंख्यांक समजून त्यांच्यासाठी आतापर्यंत देशाचे कोट्यवधी रुपये ओतूनही त्यातील एकाही पुढारलेल्या मुसलमानाने ‘औरंगजेब हा आमचा आदर्श नाही’, असे सांगण्याचे औचित्यही दाखवले नाही. अशांना सवलती देऊनही त्यातून औरंगजेबाचे वारसदार निर्माण होत असतील, तर ‘हिंदूंचा पैसा स्वत:चीच कबर खोदण्यासाठी व्यय होत आहे’, असे म्हणण्याविना पर्याय रहात नाही. याचे कारण मुसलमान उदात्तीकरण करत असलेला तोच क्रूरकर्मा आहे, ज्याने शिखांचे धर्मगुरु गुरु गोविंदसिंह यांनी हिंदु धर्माचा त्याग केला नाही; म्हणून त्यांना मुलांसह भिंतींमध्ये चिनून त्यांची क्रूरपणे हत्या केली, धर्मवीर संभाजी महाराज यांची क्रूर हत्या केली. औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचे उघड समर्थन करणार्या पुरोगाम्यांची भूमिका हिंदूंनी समजून घ्यायला हवी, तसेच हा वाद एवढ्यावर थांबेल, असे हिंदूंनी तरी गृहीत धरू नये. भविष्यातील औरंगजेबी कृत्यांची ही नांदी आहे, हे हिंदूंनी वेळीच समजून घ्यावे.
केवळ मुसलमान नेत्यांनी नव्हे, तर पुरो(अधो)गामी म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ‘संभाजीनगरला औरंगाबादच म्हणणार’, असे घोषित केले. जितेंद्र आव्हाड यांनी तर यापूर्वीच ‘औरंगजेब क्रूर नाही’, अशा वल्गना केल्या. धर्मवीर संभाजी महाराज यांची हत्या ज्यांना क्रूर वाटत नाही, साक्षी, श्रद्धा यांसारख्या सहस्रो हिंदु मुलींच्या धर्मांधांनी प्रेमाच्या जाळ्यात फसवून हत्या केल्या, तरी त्यांना‘लव्ह जिहाद’ दिसणारच नाही. आव्हाड आणि तथाकथित पुरोगामी मंडळी ही त्यामधीलच एक भाग आहेत. ज्या औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराज यांच्या डोळ्यांत तप्त सळ्या घालून, शरिराची कातडी सोलून हिंदूंच्या नववर्षारंभाच्या आदल्या दिवशी त्यांच्या शरिराचे तुकडे करवले, त्याच्या हिंदुद्वेषाचे आणि क्रौर्यतेचे आणखी कोणते उदाहरण द्यावे ? ‘मुसलमानांनी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा आदर्श घ्यावा’, ‘धर्मांधता सोडून अन्य धर्मांचा आदर करावा’, असेही हिंदूंना वाटत असावे; परंतु स्वत:ला काय वाटते, यापेक्षा मुसलमानांची मानसिकता काय आहे ? हे हिंदूंनी समजून घ्यायला हवे. औरंगजेबाची क्रूर कृत्ये हिंदूंना जरी धर्मांध वाटत असली, तरी मुसलमानांसाठी औरंगजेब हा इस्लामचा प्रसार करणारा सूफी संत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंसाठी कितीही वंदनीय असले, तरी मुसलमानांसाठी औरंगजेब हाच ‘रहमतुल्लाह अलैह’ (अल्लाला प्रिय असलेली व्यक्ती) आहे, हे हिंदूंनी समजून घ्यावे.
षड्यंत्र ओळखा !
‘छत्रपती शिवाजी महाराज यांची ‘हिंदवी साम्राज्याचे संस्थापक’ आणि ‘मोगलांचा कर्दनकाळ’ ही हिंदूंच्या मनातील प्रतिमा नष्ट केल्याविना हिंदुत्वाची भावना नष्ट करता येणार नाही’, हे पुरोगामी मंडळींना समजले आहे. त्यामुळे शरद पवार, जितेंद्र आव्हाड, संभाजी ब्रिगेडवाले आणि तथाकथित पुरोगामी यांनी जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांना पुरोगामी दाखवण्याचा प्रयत्न चालू केला. ‘छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांमध्ये मुसलमानही होते’, ‘शिवरायांचा लढा हा हिंदुत्वासाठी नव्हता’, हा प्रचार करणार्यांच्या प्रसाराचा पुढचा टप्पा औरंगजेबाचे उदात्तीकरण हा होय. काही मासांपूर्वी जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, ‘औरंगजेब हा हिंदुद्वेषी नव्हता’, हा त्याचा एक भाग आहे. ‘हिंदु’ म्हणून ओळख नष्ट करण्याचे हे नियोजित षड्यंत्र हिंदूंनी वेळीच समजून घ्यावे.
दोष कुणाचा ?
गुजरात येथील सोमनाथ मंदिर, मथुरेचे श्रीकृष्णाचे मंदिर, काशी येथील विश्वनाथाचे मंदिर अशी अनेक प्रसिद्ध मंदिरे औरंगजेबाने उद्ध्वस्त केली. हिंदूंना हिंदू म्हणून रहाण्यासाठी ‘जिझिया’ कर लावला, अशा धर्मांध औरंगजेबाचे उदात्तीकरण कुणीही धर्माभिमानी हिंदू सहन करणार नाहीत. असे असतांना बहुसंख्य हिंदूंच्या धर्मभावनांचा विचार न करता जेव्हा मुसलमान औरंगजेबाचे उदात्तीकरण करतात, तेव्हा त्यांची मानसिकता समजून घेणे आवश्यक आहे. औरंगजेब कितीही क्रूर असला, तरी तो भारताला ‘दार-उल-इस्लाम’ (जेथे इस्लामचे शासन चालते असा प्रदेश) करण्यासाठी आला होता आणि इस्लामचा प्रसार हा तलवारीच्या जोरावरच करण्यात आला आहे. ‘भारताचे इस्लामीकरण’ हे औरंगजेबाचे स्वप्न होते, तेच स्वप्न आताच्या मुसलमानांचेही आहे. ‘भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात राहून ते पालटेल’, या भ्रमात हिंदूंनी तरी राहू नये. अबू आझमीसारखे मुसलमान नेते समाजवादी, काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असोत किंवा पुरोगामी म्हणून मिरवणारे असोत, त्यांना त्यांचे ध्येय स्पष्ट आहे. त्यामुळे शरद पवार, जितेंद्र आव्हाड, नसीरुद्दीन शाह यांनी औरंगजेबाचे समर्थन करणे यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही. दोष त्यांचा आहे, जे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी मानतात.
दुर्दैव हे आहे की, एकीकडे देशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे; मात्र त्याच वेळी दुसरीकडे औरंगजेबाचेही उदात्तीकरण चालू आहे आणि देशद्रोहाचे उदात्तीकरण करणार्यांना वठणीवर आणता येत नाही. उलट औरंगजेबाचे चित्र जाळणार्यांवर गुन्हे नोंद होतात. तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली औरंगजेबाचे उदात्तीकरण लोकशाहीत कुणाही राष्ट्रप्रेमीला रूचणारे नाही. त्यामुळे छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्य पुन्हा स्थापन करण्यासाठी हिंदूंनी आतापासूनच कंबर कसायला हवी. ज्यामध्ये औरंगजेबाची देशद्रोही पिलावळ वळवळ करणार नाही.
अल्पसंख्यांक म्हणून सवलती घेऊनही औरंगजेबाचे केले जाणारे उदात्तीकरण हे भारताच्या इस्लामीकरणाचे नियोजित षड्यंत्र ! |