१६ जून २०२३ या दिवशी गोव्यातील रामनाथ देवस्थान येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चालू होत आहे. त्या निमित्ताने…
हिंदूंनो, आपला धर्म वाचवणे, हीच आपली पूजा आहे, हे लक्षात घेऊन वेळीच कृतीशील व्हा !
१. धर्मांधांच्या डोक्यातील जिहाद कसा काढणार ?
‘अरबी भाषेत एक म्हण आहे. ‘आपल्याला चिखलात पडलेल्या माणसाला बाहेर काढता येऊ शकेल; पण ज्या माणसाच्या मनात दुष्ट विचारांचा चिखल भरलेला असेल, तर तो काढणे अशक्य आहे.’ ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अशाच प्रकारे धर्मांधांच्या डोक्यात जिहाद भरवलेला आहे. जोपर्यंत त्यांच्या डोक्यातील जिहाद नष्ट होत नाही, तोपर्यंत तो मुळापासून नष्ट होणार नाही. त्यामुळे त्याला संपवण्यासाठी वरवरचे उपाय नाही, तर मुळापासून उपाय केले पाहिजेत.
धर्मांधांमध्ये लहानपणापासून मुलांना जिहादी बनवण्याचे शिक्षण दिले जाते. वर्ष २००८ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात ‘तालिबानी लोक लहान मुलांचा ‘मानवी बाँब’ म्हणून उपयोग करतात’, असे म्हटले होते. आतंकवादी संघटना ‘अल् कायदा’ने अफगाणिस्तानच्या सीमेवर मुख्य अड्डा बनवला आहे. तेथे पालकांना ५० ते ६० डॉलर्स (४ ते ५ सहस्र रुपये) देऊन त्यांच्या १० ते १३ वर्षांच्या मुलांना आणले जाते. ही मुले जिहाद करण्यासाठी सिद्ध झाल्यावर त्यांना घोड्यावर बसवून नवरदेवाप्रमाणे फिरवले जाते. तो मुलगा जिहाद करण्यासाठी जात असल्याचे पाहून लोक त्याच्या पालकांना शुभेच्छा देण्यासाठी येतात. ‘जिहाद केल्यामुळे व्यक्तीला स्वर्गप्राप्त होतो आणि स्वर्गातील ७२ पर्या मिळतात’, हे आमीष दाखवल्याने ही मुले जिहादी बनतात. ‘काफिर म्हणजे मुसलमानेतरांना ठार मारायचे आहे’, एवढेच त्यांना ठाऊक असते. हिंदु किंवा काफिर असणे, हाच मरणार्याचा दोष असतो. पाकिस्तानच्या पेशावर येथील मदरशामध्ये ७ मुले कुराण वाचत होती. तेव्हा त्यांना ‘तुमच्यापैकी किती मुलांना डॉक्टर किंवा ‘आय.ए.एस्.’ व्हायचे आहे ?’, असे विचारण्यात आले. त्यातील एकाही मुलाने हात वर केला नाही. ‘किती मुले जिहाद करणार ?’, असे विचारल्यावर सर्व मुलांनी हात वर केला. हा त्यांच्या शिकवणीचा परिणाम आहे. आर्.ए. जमाल नावाच्या एका पाकिस्तानी पत्रकाराने ‘टाइम्स’ या वृत्तपत्रात लिहिले आहे की, ६०० जिहादींचे संशोधन करण्यात आले. तेव्हा त्या सर्वांनी सांगितले, ‘‘जिहादसाठी प्रेरित करणे आणि काफिरांना मारणे यांसाठी आम्हाला स्वर्गातील ७२ पर्या मिळतात; म्हणून आम्ही जिहाद करतो.’’ मुसलमानेतरांना मारतांना जिहादींना कोणताही संकोच, भीती, संवेदनशीलता किंवा सहानुभूती वाटत नाही. पृथ्वीवरील मुसलमानेतरांचा निर्वंश करून जगभर इस्लामी धर्माचा झेंडा फडकावण्यासाठीच ते जगतात आणि मरतात. मरणारे हे मुसलमान नसतात. त्यामुळे जिहाद्यांसाठी ते शत्रूच असतात.
हिंदु जनजागृती समिती आयोजित करत असलेल्या या हिंदु अधिवेशनाला मी ‘कुंभमेळा’ असे म्हणतो. खरोखर हा आपला कुंभमेळाच आहे. याचे प्रणेते परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मी नमस्कार करतो; कारण ते संपूर्ण भारतातीलच नाही, तर जगभरातील हिंदूंना एकत्र आणत आहेत. या क्षेत्रात मी गेली ४० वर्षे कार्य करत आहे आणि १० वर्षे पूर्णवेळ कार्यरत आहे; परंतु ज्या वेळी मी येथे येतो, त्या वेळी वर्षभर पुरेल एवढी प्रेरणा येथून घेऊन जातो. – श्री. विनोदकुमार सर्वाेदय |
२. हिंदूंनी त्यांच्यावरील अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी क्षात्रवृती अंगी बाणवणे आवश्यक !
सामान्यत: अन्याय आणि अत्याचार यांनी भरलेल्या जीवनाला जिहाद समजून संघर्ष करण्याला मुसलमान लोक जीवन समजात. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणि शांती नसते. ते वर्षभर क्रौर्य, संघर्ष, हिंसाचार आणि अत्याचार यातच जीवन जगत असतात. त्यामुळे त्यांना क्वचित्च शांती मिळत असेल. याउलट हिंदू आनंदात जगत असतात. मुसलमानांमध्ये तर आनंदाचा लवलेशही नाही. केवळ काफिरांना (मुसलमानेतरांना) मारणे, हेच त्यांचे नित्यकर्म बनले आहे.
हिंदु समाज मानवतावादी आहे. जगात सनातन हिंदु संस्कृती व्यापकतेचे दर्शन घडवते. हिंदू हे सहिष्णुतेचे प्रतीक आहेत. या सहिष्णुतेला अंत नाही. हिंदू हे उदार, सहिष्णू, दयाळू आणि क्षमाशील आहेत. आपण मंदिरामध्ये देवतेचे दर्शन आणि पूजा करण्यासाठी जातो. तेथे ‘सनातन हिंदु धर्माचा विजय असो’, ‘अधर्माचा नाश होवो’, ‘विश्वाचे कल्याण होवो’, असा जयघोष केला जातो. आपल्याला अधर्म काय आहे ? आपला शत्रू कोण आहे ?, हेही ठाऊक नाही; कारण आपले पुजारी हे आपल्याला सांगत नाहीत. आपण देवीला दुष्टांचा नाश करण्यासाठी प्रार्थना करतो. देवीला प्रार्थना केली, याचा अर्थ आपण हातावर हात ठेवून निमूट बसून रहायचे आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी काहीच प्रयत्न करायचे नाही, असा होत नाही.
३. हिंदूंनी संघटित प्रयत्न केल्यासच स्वरक्षण आणि धर्मरक्षण होणे शक्य !
हिंदू आनंदी जीवन जगत असतात. त्यांनी आपल्यातील देशप्रेमाच्या ऐवजी विदेशातील भोगवादी जीवनशैली आत्मसात केली आहे. जपान, जर्मनी, अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स यांच्या नागरिकांना त्यांच्या देशाविषयी किती देशप्रेम आहे ? याचा विचार हिंदू करत नाहीत. आपल्या देशासाठी काहीतरी करावे, असे कुणा भारतियाला वाटत नाही. एक लहानशी गोष्ट सांगतो. एकदा जंगलात पुष्कळ मोठी आग लागली होती. एक चिमणी तिच्या चोचीत पाणी घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा सिंह तिला म्हणाला, ‘‘तुझ्या इवल्याशा चोचीने पाणी घातल्याने जंगलाला लागलेली आग विझणार आहे का ?’’ त्यावर चिमणी म्हणाली, ‘‘मी जंगलाला लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न तरी करत आहे. त्यामुळे उद्याची पिढी मला आग विझवण्यासाठी काहीच न केल्याविषयी दूषण देणार नाही. मी माझा धर्म माझ्या क्षमतेनुसार निभावत आहे.’’ याचा मतितार्थ इतकाच की, धर्म जाणून घ्या. धर्म हा कर्मासह करायचा असतो आणि आत्मरक्षण करणे, हा सर्वांत मोठा मानवधर्म आहे. आपला धर्म वाचवणे, हीच आपली पूजा आहे.
भारतात आक्रमकांनी अगणित मंदिरे पाडली; कारण भारतियांमध्ये एकजूट नव्हती. आपल्यात एकजूट नाही, ही सर्वांत मोठी समस्या आहे. आपल्यामधील फितुरांमुळे आपण अनेक वेळा पराभूत झालो आहोत. धर्मांधांनी अफगाणिस्तान, पाकिस्तान, काश्मीर, बांगलादेश इत्यादी प्रदेशांमधून हिंदूंना हुसकावून लावले आणि तेथे त्यांचे बस्तान बसवले. एवढाही विचार हिंदू करत नाहीत. त्यामुळे हिंदूंना जिवंत रहाण्यासाठी काहीतरी ठोस कृती करावीच लागेल.
४. भारतीय नेते आणि धर्मगुरु यांच्याकडून हिंदूंना षंढ बनवण्याचा प्रयत्न
एकदा डॉ. राम मनोहर लोहिया यांनी म्हटले होते, ‘भारत पुन्हा पुन्हा गुलाम झाला; कारण आपण शत्रूसमोर वाकतो आणि प्रत्येक वेळी तडजोड करतो. आपण एवढे वाकत गेलो, तर एक दिवस आपले अस्तित्वच नष्ट होईल.’ ‘इस्लामी आक्रमकांनी आपली मंदिरे पाडली’, असे रडगाणे सतत गाणे योग्य नाही; कारण आपण त्यांच्या आक्रमणांपुढे दुर्बळ झालो होतो, हे सत्य आहे. त्यामुळे आपण हिंदु धर्माचा तेजस्वीपणा स्वतःमध्ये बाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यातील तेजस्वीपणा आणि ओजस्वीता नष्ट होत आली आहे. आपले नेते आणि धर्मगुरु आपल्यामध्ये आक्रमकता येण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाहीत. उलट ते आपल्यामध्ये शत्रूकडून तुडवून घेण्याची पराभूत मानसिकता निर्माण करत आहेत. डॉ. लोहिया यांनी म्हटले होते, ‘भारतमातेचे मस्तक, श्रीकृष्णाचे हृदय आणि श्रीरामाची मर्यादा असलेले कर्म अन् वचन आम्हाला द्या.’ भारतीय शस्त्रपूजक आहेत; परंतु आपल्याला शस्त्र बाळगण्याची अनुमती दिली जात नाही. हा आपल्याला दुर्बल करण्याचा प्रयत्न नाही का ? यावर सर्वांनी अवश्य विचार करावा.
अनुमती असो किंवा नसो, धर्मांध त्यांच्याजवळ शस्त्रे बाळगणे सोडत नाहीत. हिंदू भारतीय राज्यघटनेचा आदर करतात; म्हणून ते शस्त्रे बाळगू शकत नाहीत. हिंदूंना शस्त्रे बाळगण्याची अनुमती मिळण्यासाठी कायदा बनवला पाहिजे. ‘भारताची सभ्यता आणि संस्कृती यांमध्ये इतकी शक्ती आहे की, ती जगात मानवतेला वाचवण्यासाठी पुष्कळ मोठे कार्य करू शकते’, हा विचार जॉन वूडवर्क यांनी दिला आहे. त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात म्हटले आहे, ‘भारतीय सभ्यता संकटात आहे. भारतीय सभ्यतेचा विनाश हा संपूर्ण जगासाठी आपत्तीकारक ठरेल.’ ते ब्रिटीश होते आणि त्यांचा कोलकाता येथे जन्म झाला होता. त्याच प्रकारे अमेरिकेतील इतिहासकार सर विल्यम जेम्स यांनी म्हटले आहे, ‘आजच्या प्रत्येक भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे की, त्यांना भारताचा संपूर्णत: परिचय नाही.’ भारतात प्रवास करायला आलेले विदेशी लोक भारताच्या संस्कृतीची महानता आणि सभ्यता चांगले जाणत होते; परंतु आपला समाज, नेते अन् धर्मगुरु आपल्याला ‘अत्याचार सहन करू नका,’ अशी शिकवण देत नाहीत.
५. हिंदुत्व नष्ट करण्यासाठी जागतिक पातळीवर मुसलमान राष्ट्रे संघटित !
अत्याचार सहन करणे, ही सर्वांत वाईट गोष्ट आहे. आर्य चाणक्य यांनी म्हटले होते, ‘जर व्यक्तीला राष्ट्रवाद ठाऊक नाही, त्याच्यात देशभक्ती नाही आणि तो राष्ट्राविषयी जागृत नसेल, तर तो त्याच्या शिक्षकाचा पराजय आहे. व्यक्ती देशाच्या कणाकणावर राष्ट्रभक्तीच्या भावनेने प्रेरित झालेली असेल, तर तो शिक्षकांचा विजय आहे.’ अलीकडच्या काळात ‘हिंदुफोबिया’ (हिंदुद्वेष) आणि हिंदुत्ववाद नष्ट करणे, म्हणजेच ‘डिसमेंटल हिंदुईझम्’ यांचे नवीन प्रकरण चालू झाले होते. १० ते १२ सप्टेंबर २०२१ या दिवशी अमेरिकेतील ‘डिसमेंटलींग ग्लोबल हिंदुत्व’(जागतिक हिंदुत्ववादाचे उच्चाटन) या विषयावर परिषद झाली. भारतात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून जगभरातील सर्व मुसलमान राष्ट्रे भारत सरकारच्या विरोधात सक्रीय झाली आहेत. ‘भारतामध्ये हिंदुत्वाचा प्रसार थांबवला पाहिजे’, असे त्यांचे मत आहे. त्या वेळी त्या परिषदेमध्ये जगातील ५० विश्वविद्यालयांमधील ७० विभागांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्या वेळी तेथे आणखी एका शब्दाचा उपयोग करण्यात आला ‘इस्लामचे भय’(इस्लामिकफोबिया). इस्लामच्या भयाचे विचार सध्या पुष्कळ प्रमाणात वाढले आहेत. इस्लाम किंवा इस्लामला मानणारे मुसलमान यांच्यामध्ये हिंसाचार करण्याच्या भीतीविषयी असलेल्या भावनेला ‘इस्लामचे भय’, असे म्हटले जाते. इस्लामचे भय नष्ट करण्यासाठी मुसलमान देश सक्रीय झाले आहेत. त्यांच्या मते इस्लामची भीती बाळगू नका. मुसलमानेतर असलेल्या आपल्या मुलांना पळवून नेणे, आपल्याला लुटणे आणि मारणे, ही मुसलमानांची ‘रेगिस्तानी (वाळंवटातील) संस्कृती’ आहे. त्याच्या विरोधात आपल्याला इस्लामशी लढणे आवश्यक आहे.
६. सरकारकडून मुसलमानांचे लांगूलचालन ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा
वर्ष २०२२-२३ मध्ये भारतात अल्पसंख्यांकांना ५ सहस्र कोटी रुपये दिले. गेल्या ८ वर्षांमध्ये त्यात अनुमाने २ सहस्र कोटी रुपयांची वाढ झाली आहे. अप्रत्यक्ष जिहाद फोफावण्यासाठी आपण इतके पैसे देतो. सरकार म्हणते, ‘‘आम्ही मुसलमानांचे लांगूलचालन करत नाही, तर त्यांचे सशक्तीकरण करत आहोत !’’ भारतातील मुसलमानांचे सशक्तीकरण करणे बंद झाले पाहिजे.
७. प्रत्येक हिंदु तरुणाने धर्मकार्यासाठी प्रतिदिन १ घंटा द्यावा !
सर्व तरुणवर्गाने या धर्मकार्यासाठी प्रतिदिन किमान १ घंटा द्यावा. इस्लामी जिहाद आणि ख्रिस्त्यांकडून हिंदूंचे होणारे धर्मांतर यांच्या विरोधात समाजातील सर्वांना जागरूक करणे आवश्यक आहे. आपल्याला प्रतिदिन भेटणार्या व्यक्तींना आपल्या शत्रूंविषयी जागृत केले पाहिजे. याविषयी समाजात प्रतिदिन थोडे थोडे सांगितले पाहिजे. या कार्यासाठी प्रत्येकाने प्रतिदिन १ ते २ घंटे देणे आवश्यक आहे. आपल्या देशाचे रक्षण करणे, हे आपले आद्यकर्तव्य आणि अत्यंत पुण्यवान कार्य आहे.’
– श्री. विनोदकुमार सर्वाेदय, गाझियाबाद, उत्तरप्रदेश.