स्विडनमध्ये येत्या ८ जूनपासून आयोजित केली जाणार पहिली शारीरिक संबंधांची स्पर्धा !

स्विडनने शारीरिक संबंधांना दिली ‘खेळ’ म्हणून मान्यता !

स्विडन (स्टॉकहोम) – युरोपमधील स्विडन देशाने प्रथमच शारीरिक संबंधांना ‘खेळ’ म्हणून मान्यता मिळाली आहे. युरोपातील देशांसाठी गोटेन्बर्ग या शहरात पहिल्या शारीरिक संबंधांची स्पर्धाही आयोजित केली आहे. येत्या ८ जूनपासून ही स्पर्धा पुढील काही आठवडे चालणार आहे. ‘स्विडिश फेडरेशन ऑफ सेक्स’ने याचे आयोजन केले आहे.

सहभागी स्पर्धकांना ‘खेळा’साठी अंदाजे ४५ मिनिटे ते एक घंटा वेळ दिला जाणार आहे. ३ परीक्षक आणि प्रेक्षकांचे मानांकन यांवरून विजेते घोषित करण्यात येणार आहेत. १६ विषयांत ही स्पर्धा असणार आहे. ‘स्विडिश फेडरेशन ऑफ सेक्स’चे अध्यक्ष ड्रॅगन ब्रॅटिच यांनी म्हटले आहे की, शारीरिक संबंधांना खेळ म्हणून मान्यता दिल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्याला चालना मिळेल.

संपादकीय भूमिका

पाश्‍चात्त्य देशांमध्ये नैतिकतेचे अधःपतन फार पूर्वीच झालेले असल्याने त्याने आता टोक गाठले गेले आहे, हेच यातून लक्षात येते ! पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणारे भारतीयही उद्या अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करू लागले, तर आश्‍चर्य वाटू नये !