रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. परशुराम पाटील आणि त्यांच्या पत्नी खानापूर (जिल्हा बेळगाव) येथील सौ. पूजा परशुराम पाटील यांचे आदर्श वर्तन !

श्री. परशुराम पाटील

१. ‘१५.१२.२०२२ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘पतीला आश्रमात पूर्णवेळ राहून साधना करण्यास सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या आणि गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर स्थिर राहून कठीण प्रसंगांना सामोरे जाणार्‍या खानापूर (जिल्हा बेळगाव) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पूजा परशुराम पाटील !’, असा मथळा असलेला लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखात गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) ‘आध्यात्मिकदृष्ट्या एक आदर्श पती-पत्नी म्हणजे रामनाथी आश्रमातील श्री. परशुराम आणि खानापूर (जिल्हा बेळगाव) येथील सौ. पूजा पाटील !’, अशी टीप दिली होती. ती टीप वाचून माझी पत्नी सौ. पूजा मला म्हणाली, ‘‘आपण यावर न थांबता आपल्याला परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित असे आणखी प्रयत्न करून आदर्श घडायचे आहे.’’ तेव्हा ‘जे झाले त्यावर समाधानी न रहाता आणखी प्रयत्न करायला हवेत’, हे मला तिच्याकडून शिकायला मिळाले. याविषयी गुरुदेवांना कळवल्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्हा दोघांची आध्यात्मिक प्रगती चांगली चालू आहे.’’

सौ. पूजा पाटील

२. गुरुदेवांनी मला विचारले, ‘‘तुमच्यात कधी भांडणे होत नाहीत का ?’’ तेव्हा मी सांगितले, ‘‘शाब्दिक होतात; पण मी आश्रमातून घरी येण्याबद्दल, खाण्याबद्दल, कपड्यांबद्दल, अशी कधीच भांडणे होत नाहीत.’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘तुमचे बोलणे समाजातील लोकांसारखे नाही. दोघांचे बोलणे आणि वागणे आध्यात्मिक स्तरावर आहे.’’

– श्री. परशुराम पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.२.२०२२)