‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ जवळ घेतल्यावर पाय दुखणे उणावणे आणि ग्रंथ बाजूला ठेवल्यानंतर पुन्हा पाय दुखू लागणे, असे पुन्हा होणे

श्री. सचिन हाके

‘२७.१.२०२१ च्या रात्री झोपल्यावर गुडघ्यापासून खालपर्यंत माझे पाय पुष्कळ दुखत होते. ‘परम पूज्य गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) त्यांच्या हाताने माझ्या पायांवरील आवरण काढत आहेत’, असा मी भाव ठेवला.

त्यानंतर मी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ जवळ घेतला. ग्रंथ जवळ घेतल्यानंतर माझे पाय दुखणे ८० टक्क्यांनी उणावले. थोड्या वेळाने माझ्या मनात विचार आला, ‘ग्रंथ बाजूला ठेवून बघूया.’ मी ग्रंथ बाजूला ठेवल्यानंतर पुन्हा माझे पाय दुखायला लागले. नंतर पुन्हा मी ग्रंथ जवळ घेतला, तेव्हा माझे पाय दुखायचे थांबले. त्यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘या ग्रंथामधील चैतन्य किती अफाट आहे’, यामुळे मला प.पू. गुरुमाऊलींच्या चैतन्याची अनुभूती घेता आली.’

– श्री. सचिन हाके, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक