‘मी गोव्याला गेले असतांना वैशाख कृष्ण सप्तमी (२२.५.२०२२) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी, गोवा येथे रथोत्सवाचा कार्यक्रम होता. मी रथोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्या वेळी रथाच्या मागून चालतांना मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. ‘अनेक जन्मांपासून सनातनचे साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेतच आहेत’, असे जाणवणे
रथोत्सवाच्या आरंभी माझ्या मनात आले, ‘ही गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) समवेत असलेली भावफेरी आहे. आम्ही सर्व साधक अनेक जन्मांपासून आमच्या प्राणप्रिय गुरुदेवांच्या समवेतच आहोत. तेच आम्हाला या पृथ्वीतलावर घेऊन आले आहेत आणि त्यांच्या अवताराच्या (टीप) समाप्तीनंतर ते आम्हा सर्वांना त्यांच्या समवेतच घेऊन जाणार आहेत.
टीप : महर्षींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले अवतार आहेत’, असे सांगितले असून आम्हा साधकांचाही तसा भाव आहे.
२. ‘रथोत्सवाच्या वेळी चालतांना जणू प्रत्येक पावलासह आमची पापे नष्ट होत असून आम्ही संपूर्ण शुद्ध आणि पवित्र होत आहोत’, असे मला वाटत होते.
३. ‘सर्व जीवनच गुरुचरणी समर्पित करायचे आहे’, असे वाटणे
रथोत्सवात हातात ध्वज घेऊन चालतांना माझ्या मनात विचार आले, ‘आम्हाला जगभरामध्ये धर्मप्रसार करायचा आहे. आम्हाला आमचे संपूर्ण जीवनच गुरुदेवांच्या परमपावन श्री चरणी समर्पित करायचे आहे.’
– सौ. श्रेया प्रभु (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४६ वर्षे), वाराणसी सेवाकेंद्र.(२२.५.२०२२)