जोधपूर (राजस्थान) येथील कु. वेदिका मोदी हिचे १० वीच्या परीक्षेत ९६.८ टक्के गुण मिळवून सुयश

कु. वेदिका मोदी

जोधपूर (राजस्थान) – येथील सनातनच्या संत पू. (श्रीमती) सुशीला मोदी यांची नात कु. वेदिका मोदी (आध्यात्मिक पातळी ५७ टक्के) हिने १० वीच्या परीक्षेत ९६.८ टक्के गुण मिळवून सुयश संपादन केले. या यशाविषयी मनोगत व्यक्त करतांना तिने सांगितले, ‘‘परीक्षेचा निकाल येईपर्यंत मी मनात हीच प्रार्थना करायचे की, परीक्षेचा जो काही निकाल लागेल, तो देवाच्या इच्छेनुसारच लागेल. देवाच्या कृपेनेच मला ९६.८ टक्के गुण मिळाले आहेत. त्याविषयी मी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’’

कु. वेदिका पुढे म्हणाली, ‘‘परीक्षेत पेपर लिहितांना प्रश्नाचे उत्तर आठवत नव्हते, तेव्हा मी ईश्वराला शरण जात होते. त्यामुळे देव काही ना काही सुचवत असे. प्रत्येक उत्तर लिहिल्यानंतर मी कृतज्ञता व्यक्त केली. माझ्या मनात हा भाव असायचा की, गणपति आणि सरस्वतीदेवी मला ज्ञान देत आहेत अन् परात्पर गुरु डॉ. आठवले हे माझा हात धरून माझ्याकडून उत्तरे लिहून घेत आहेत. इतर परीक्षांमध्ये पुष्कळ ताण आणि चिंता असायची. अन्य विषयांचा अभ्यास करतांना डोके जड व्हायचे; पण संस्कृत विषयाचा पेपर लिहितांना मी दैवी सात्त्विकता, आनंद अनुभवत होते. ही देवभाषा असल्याने संस्कृतमध्ये उत्तरे लिहितांना ‘मी देवतांशी बोलत आहे’, असे मला जाणवत होते. परीक्षा चालू असतांना कोणतीही सेवा आली की, मी ती सेवा सहज स्वीकारत होते; कारण सेवेच्या माध्यमातून देव शक्ती देईल, असे वाटायचे.’’

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक