अ – ‘अवघे विश्वची माझे घर’ गुरुदेवांनी हे स्वतः आचरणात आणून साधकांना तसे रहायला शिकवले.
आ – ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्मा’चा मार्ग दाखवणारे प.पू. गुरुदेव साधकांना भेटले.
इ – इतरांचे गुण बघायला त्यांनी शिकवले.
ई – ईश्वराप्रती आत्मनिवेदन करायला शिकवले.
उ – उत्साहाने रहायला शिकवले.
ऊ – ऊर्जा देऊन साधनेसाठी ईश्वराला समर्पित व्हायला शिकवले.
ए – एकरूप भगवंताशी होण्यासाठी भावाचे प्रयोग शिकवले.
ऐ – ऐहिक सुखाचा त्याग करून साधकांपुढे ईश्वरप्राप्तीसाठी आदर्श ठेवला.
ओ – ओढ साधनेची साधकांना लावली.
औ – औक्षणाचे महत्त्व सांगून तिथीनुसार वाढदिवस करायला शिकवले.
अं – अंधःकारातून प्रकाशाकडे घेऊन जाणार्या प.पू. गुरुदेवांनी साधकांना अंतरंगाचा अभ्यास करून आत्मचिंतन करायला शिकवले.
अ: – अ: पर्यंत साधनेतील सर्वांना ‘अ’पासून घेऊन जाणे
‘गुरुदेव, आपण सामान्य जिवाला समजेल, अशी साधना सांगून ती करवून घेतलीत आणि अनेक जिवांचा उद्धार केला. ‘हे गुरुदेवा, तुम्हीच सुचवलेली ही शब्दसुमने तुमच्या चरणी अर्पण करत आहे. कृतज्ञ आहे. गुरुदेवा, कृतज्ञ आहे.’
– सौ. सुजाता अशोक रेणके, फोंडा, गोवा. (२७.६.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |