दुचाकी वाहन पेट्रोल नसतांनाही २ किलोमीटर अंतरावरील पेट्रोलपंपापर्यंत जाणे आणि तेथे पोचल्‍यावर दुचाकी बंद पडणे

साधकाला आलेली वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

‘१९.१.२०२१ या दिवशी मी गावाला असतांना तिथून १० किलोमीटर अंतरावर दूर असलेल्‍या माझ्‍या मावशीकडे गेलो होतो. तेव्‍हा मावशीच्‍या घरी गेल्‍यावर माझ्‍या दुचाकीतील पेट्रोल संपले होते. मावशीच्‍या घरापासून २ किलोमीटर अंतरावर पेट्रोल पंप आहे. माझ्‍या मनात ‘आता पेट्रोलपंपापर्यंत कसे जायचे ?’, असा विचार आला. तेव्‍हा मी देवाला शरण गेलो. देव आणि वाहनदेवता यांना प्रार्थना केली, ‘देवा, आता तूच मला घेऊन चल ! आतातरी मी २ किलोमीटर अंतर चालू शकत नाही. काय ते तूच कर !’ मी असे म्‍हणालो आणि गाडी चालू करून निघालो. तेव्‍हा गाडी २ किलोमीटर पर्यंत गेली आणि पेट्रोलपंपाजवळ गेल्‍यावर बंद पडली. तेव्‍हा देवाच्‍या चरणी पुष्‍कळ कृतज्ञता व्‍यक्‍त झाली. देवच आपली काळजी घेऊ शकतो; कारण आपण देवाचे लाडके आहोत !’

– श्री. सचिन हाके, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक