रामनाथी आश्रमात दत्तमाला मंत्रपठण करतांना उदबत्ती ठेवलेल्या ताटलीत दोन ‘ॐ’ उमटणे !

सौ. अनुपमा जोशी

‘आज (१२.३.२०२३ या दिवशी) सकाळी ९.५० वाजता मी सनातन आश्रमात दत्तमाला मंत्रपठणासाठी गेले होते. ९.५८ वाजता मी एका ताटलीत उदबत्ती लावून आसंदीत बसले. दत्तमाला मंत्रपठण करतांना प्रार्थना केल्यानंतर माझे लक्ष उदबत्तीकडे गेले. त्या वेळी मला उदबत्ती ठेवलेल्या ताटलीत दोन ‘ॐ’ उमटल्याचे दिसले. मी २ – ३ वेळा (डोळ्यांत पाणी येत असल्याने) माझे डोळे पुसून परत परत पाहिले. दत्तमाला मंत्रपठण झाल्यावर मी सहसाधिकेला म्हटले, ‘‘ताई, त्या उदबत्तीच्या ताटलीत तुम्हाला काही दिसते का ?’’ त्यांनी पाहिल्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘होय काकू, तेथे ‘ॐ’ उमटलेले दिसत आहेत.’’ नंतर ताटलीचे छायाचित्र काढल्यावर तिच्यामध्ये दोन ‘ॐ’ उमटल्याचे स्पष्ट दिसत होते. मला पुष्कळ आनंद झाला. मी सकाळी ताटली घासून पुसून तिच्यातील बाटलीत उदबत्ती लावली होती. उदबत्तीची विभूतीही ताटलीत पडली नव्हती, तरीही ताटलीत दोन ‘ॐ’ उमटले. ‘या अनुभूतीच्या माध्यमातून देवाने तो दत्तमाला मंत्रपठणाला आल्याची साक्ष दिली’, असे मला जाणवले.’

– सौ. अनुपमा जोशी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.३.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक