श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि गीता धर्म मंडळाच्या पुढाकाराने आयोजन
पुणे – संपूर्ण गीतेचे पठण लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात करण्यात आले. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या १२६ व्या वर्षी आणि गीता धर्म मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘दत्तमंदिर ट्रस्ट’चे अध्यक्ष युवराज गाडवे, विश्वस्त अधिवक्ता शिवराज जहागीरदार आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
या वेळी युवराज गाडवे म्हणाले की, भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या शेवटच्या रचनेतील एक ग्रंथ म्हणून ‘गीतोपनिषद’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यात श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाविषयी केलेला उपदेश आहे. भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे याचे पठण मंदिरात करण्यात आले.