हिंदु धर्माप्रमाणे साडी परिधान केल्याने आध्यात्मिक लाभ होणे

धर्माचरणाचा लाभ 

सौ. राधा साळोखे

१. साडी परिधान केल्यावर कमरेच्या खालचा संपूर्ण भाग दुखणे; मात्र त्याच कालावधीत पंजाबी पोषाख घातल्यावर वेदना न होणे 

‘मागील काही दिवसांपासून मी नियमित साडी नेसायला आरंभ केला. तेव्हा अचानक माझ्या कमरेखालचा संपूर्ण भाग पुष्कळ दुखायला लागला. मला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्यामुळे वेदनांची तीव्रता पुष्कळ अधिक होती. आरंभीचे काही दिवस मला ‘हा त्रास अंगदुखीचाच एक भाग आहे’, असे वाटले. त्याच कालावधीत मी साडीऐवजी पंजाबी पोशाख घालायचे, तेव्हा मला वेदना होत नसत.

२. ‘साडी नेसल्यामुळे माझ्यावर आध्यात्मिक लाभ होत असल्याने मला या वेदना होत आहेत’, असे माझ्या लक्षात आले आणि मी साधारण २ – ३ घंटे नामजपादी आध्यात्मिक उपाय केल्यावर वेदना सुसह्य होत असत.

३. हिंदु धर्मात जन्माला घालून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून प्रत्येक कृतीचे शास्त्र शिकवल्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता 

यावरून ‘हिंदु धर्मात सांगितलेली प्रत्येक कृती केल्याने कसे लाभ होतात ?’, हे माझ्या लक्षात आले. देवाने मला हिंदु धर्मात जन्माला घालून प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) माध्यमातून प्रत्येक कृतीचे शास्त्र शिकवले. याविषयी देवाप्रती आणि प.पू. गुरुदेवांच्या प्रती कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. राधा साळोखे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

(२१.७.२०२१)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक