चीन ऑनलाईन मंचांवरून हटवत आहे त्याच्या देशातील गरीबीविषयीचे व्हिडिओ !

बीजिंग (चीन) – चीनमध्ये गरीबी आहे, या संदर्भातील व्हिडिओ ऑनलाईन मंचांवरून हटवला जात आहे. यामागे चीन सरकार आहे, असा दावा करणारे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने प्रसारित केले आहे. सरकार देशातील गरीबी जगाला दाखवू इच्छित नाही, असे सांगितले जात आहे.
नुकतेच चीनमधील एका सेवानिवृत्त व्यक्तीचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता.


यात ही व्यक्ती दुकानदाराकडून किराणा साहित्यही विकत घेऊ शकत नाही, असे दाखवण्यात आले होते. हा व्हिडिओ चिनी अधिकार्‍यांकडून हटवण्यात आला आहे.

यासह एका गायकाने युवक आणि सुरक्षित लोक यांच्यासमोर आर्थिक संकट अन् निराशाजनक नोकरीची शक्यता आदी सूत्रांवर गाणे गायले. त्यानंतर हे गाणे सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले. त्यानंतर या गाण्यावर बंदी घालण्यासह या तरुणाचे सामाजिक मध्यमावरील खाते बंद करण्यात आले.