परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ७८ व्‍या जन्‍मोत्‍सवाचा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना साधकांना आलेल्‍या अनुभूती

१. श्री. नीलेश मतकर, डोंबिवली (पश्‍चिम), ठाणे.

अ. ‘संत आणि साधक यांची भावावस्‍था अन् त्‍यांनी केलेले प्रयत्न पाहून ‘आपली देवाप्रती शरणागती वाढायला हवी’, याची मला जाणीव झाली.

आ. ‘देवाजवळ जाण्‍यासाठी नामजपादी उपाय करणे आवश्‍यक आहे’, हे माझ्‍या लक्षात आले आणि मला स्‍वभावदोष अन् अहं यांच्‍या निर्मूलनाचे प्रयत्न गांभीर्याने करण्‍यास स्‍फूर्ती मिळाली.’

२. सौ. कपिला घाणेकर, डोंबिवली (पश्‍चिम), ठाणे.

अ. ‘१३.५.२०२० या दिवशी सोहळा पहातांना मला पुष्‍कळ आनंद मिळत होता आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टरांप्रती सतत कृतज्ञता वाटून माझी भावजागृती होत होती. ‘गुरुदेवांप्रती जितकी कृतज्ञता व्‍यक्‍त करावी, तितकी अल्‍प आहे’, असे मला वाटत होते.

आ. सोहळ्‍यात परात्‍पर गुरु डॉक्‍टर साधकांच्‍या शंकांचे निरसन करत होते. तेव्‍हा त्‍यांचा तोंडवळा गुलाबी दिसत होता. त्‍यांच्‍या हाताचे तळवेही गुलाबी दिसत होते.

इ. आम्‍ही कार्यक्रमात गुरुपूजनासाठी घरातील परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे छायाचित्र ठेवले होते. त्‍या वेळी ते छायाचित्र जिवंत आणि लाल दिसत होते. तेव्‍हा मला गुरुदेवांचे अस्‍तित्‍व जाणवत होते.

ई. गुरुपूजनात गुरुदेवांना अर्पण केलेली मोगर्‍याची फुले इतक्‍या उष्‍ण वातावरणातही दुसर्‍या दिवसापर्यंत ताजी आणि टवटवीत होती. त्‍यांच्‍याकडे पाहून मला प्रसन्‍न वाटत होते. ‘फुले आनंदाने कृतकृत्‍य झाली आहेत आणि श्री गुरुचरणांवर अर्पण होण्‍यास मिळाल्‍यामुळे त्‍यांच्‍या जन्‍माचे सार्थक झाले आहे’, असे मला वाटले.’

३. सौ. रेवती सावंत, डोंबिवली (पश्‍चिम), ठाणे.

अ. ‘१३ आणि १५.५.२०२० या दिवशी सकाळपासूनच मला पुष्‍कळ उत्‍साह जाणवत होता.

आ. घरात भजने लावल्‍यामुळे वातावरण प्रसन्‍न होते. देवपूजा करतांना ‘स्‍वतः गुरुमाऊली आली आहे आणि पूजा करून घेत आहे’, असे मला वाटले. तेव्‍हा ‘गुरुदेव माझ्‍याकडे पाहून हसत आहेत’, असे मला जाणवले.’

४. सौ. स्नेहा मालवणकर, खारेगाव, कळवा, ठाणे.

अ. ‘कार्यक्रम पहातांना माझी भावजागृती होत होती. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेविषयी सांगितल्‍यावर माझ्‍या मनावरील ताण न्‍यून होऊन माझा साधनेसाठी प्रयत्न करण्‍याचा निर्धार झाला. गुरुदेवांच्‍या वाणीतून मला माझ्‍या सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळाली.

आ. ‘घरात खोके लावणे, उदबत्ती लावणे’ इत्‍यादी आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय केल्‍यावर ‘घराला आश्रमाचे स्‍वरूप येत आहे’, असे मला जाणवले.

इ. ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर घरी येणार आहेत’, असा भाव ठेवून मी सकाळी लवकर उठून रांगोळी काढली, तसेच चंदनाची उदबत्ती लावली. त्‍यामुळे आज घरात वेगळेच वातावरण जाणवत होते. ‘आपण आश्रमातच आहोत’, असे मला वाटत होते.

ई. इतर वेळी कार्यक्रम बघतांना मला ‘झोप येणे, अंग जड होणे’, असे त्रास व्‍हायचे; पण आज उत्‍साह आणि चैतन्‍य जाणवत होते अन् ‘कार्यक्रम संपूच नये’, असे वाटत होते.

उ. गुरुदेवांनी कार्यक्रमात सांगितले, ‘स्‍वतःच्‍या मनाने न करता ‘ईश्‍वराला आवडेल’, असा प्रयत्न करा; तसेच नामजप करतांना मन अंतर्मुख असेल, तर सूचनासत्र अंतर्मनात पोचते.’ ते ऐकून माझ्‍याकडून तशी कृती करण्‍याचा प्रयत्न झाला.’

५. श्री. राजेश उमराणी, खारेगाव, कळवा, ठाणे.

अ. ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना बोलतांना आणि हसतांना पाहून माझी भावजागृती झाली.

आ. त्‍यांनी सांगितल्‍याप्रमाणे ‘स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया मनापासून राबवावी’, असे मला वाटले.

इ. मला संपूर्ण सोहळ्‍यात चैतन्‍य जाणवले आणि मला आध्‍यात्मिक लाभ झाला.’

६. डॉ. अंजली पाटील, कळवा, ठाणे.

अ. ‘सोहळ्‍याच्‍या दिवशी सकाळपासून माझे मन निर्विचार झाले होते. माझ्‍या मनाला शांत वाटत होते. माझ्‍या मनात कोणताही विचार नव्‍हता. माझा नामजप अखंड चालू होता. अशी शांतता मी यापूर्वी कधीही अनुभवली नव्‍हती.

आ. एक वेगळाच अद़्‍भुत आनंद माझ्‍या मनात व्‍यापून राहिला होता.

इ. मला संपूर्ण सोहळा कृतज्ञताभावात पहाता आला. माझी सतत भावजागृती होत होती.’

७. श्रीमती स्‍वाती कुलकर्णी, ठाणे

अ. ‘यापुढे सांगितलेली सेवा संपूर्ण शरण जाऊन बुद्धीचा अडथळा न आणता करायची’, असा निश्‍चय गुरुदेवांनीच करून घेतला आहे’, असे मला वाटले.

आ. कार्यक्रमाच्‍या वेळी मला गुरुदेवांचे अस्‍तित्‍व जाणवत होते.

इ. ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी सर्व जग व्‍यापले आहे’, असे मला जाणवले.

ई. ‘सर्व साधक परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या हृदयात जात आहेत’, असे मला वाटत होते.’

८. श्री. नितीन दुवेदी आणि सौ. भाग्‍यश्री दुवेदी, घंटाळी, ठाणे.

अ. ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले आसंदीवर बसले आहेत’, असे मला जाणवले. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या छायाचित्राला आदल्‍या दिवशी वाहिलेली तुळस दुसर्‍या दिवशीही टवटवीत होती.

आ. भावार्चना करतांना मला ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर श्रीविष्‍णूच्‍या रूपात समुद्रात शयन करतांना दिसले.

इ. सर्व संतांनी अनुभूती सांगून मार्गदर्शन केले. त्‍या वेळी ‘आपण त्‍या संतांना प्रत्‍यक्ष बघत आहोत’, असे मला वाटले.

ई. ‘आपण हा कार्यक्रम विष्‍णुलोकात बसून बघत आहोत’, असे मला वाटत होते.’

९. सौ. नम्रता प्रवीण खेताडे, ठाणे

अ. ‘प्रत्‍यक्ष कार्यक्रम बघतांना माझ्‍या डोळ्‍यांतून भावाश्रू येत होते. ‘हा भावसोहळा संपूच नये’, असे मला वाटत होते.’

१०. सौ. सारिका माने, ठाणे

अ. ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर साधकांना मार्गदर्शन करत असतांना मला त्‍यांच्‍याभोवती प्रकाश दिसला आणि ‘त्‍यांच्‍याकडून आम्‍हाला पुष्‍कळ चैतन्‍य मिळत आहे’, अशी अनुभूती आली.’

११.  सौ. केशर गिरकर, ठाणे

अ. ‘कार्यक्रम झाल्‍यावर ‘सर्व साधकांवर फुलांचा वर्षाव होत आहे आणि जे जीव हा कार्यक्रम पहात आहेत, त्‍या सगळ्‍यांवर कृपेचा वर्षाव होत आहे’, असे मला जाणवले.’

१२. सौ. सुनीता सूर्यवंशी, ठाणे

अ. ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर आपल्‍या समवेत आहेत’, असे जाणवून दिवसभर माझी भावजागृती होत होती.

आ. त्‍या दिवशी घरात पुष्‍कळ चैतन्‍य जाणवत होते.

इ. १३.५.२०२० या दिवशी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या छायाचित्राला वाहिलेले फूल ४ दिवस टवटवीत होते.’

१३. सौ. भार्गवी कर्गुटकर, ठाणे

अ. ‘या सोहळ्‍यात रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री भवानीदेवीच्‍या मूर्तीच्‍या आगमनाची ध्‍वनीचित्र-चकती दाखवण्‍यात आली. श्री भवानीदेवीच्‍या मूर्तीचे आगमन होत असतांना ‘शरिरात शक्‍ती संचारत आहे’, असे वाटून माझी भावजागृती झाली. ‘ही अवस्‍था मी पुष्‍कळ वेळ अनुभवत होते’, यासाठी श्रीकृष्‍ण, परात्‍पर गुरु डॉक्‍टर आणि श्री भवानीदेवी यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

(सर्व सूत्रांचा दिनांक : ११.४.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक